Pegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

भारतीय संसजेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग होत आहे. ज्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय.

Pegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 3:51 PM

मुंबई : संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोन टॅपिंगवरुन काँग्रेसनं जोरदार गोंधळ घातला. मोदी सरकारकडून राजकीय मंडळींसह अनेक क्षेत्रातील लोकांचे फोन टॅप केले जात अशल्याचा आरोप करुन खळबळ उडवून दिली. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारतीय संसजेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग होत आहे. ज्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय. (Chinese funding to 1-2 media houses in the country, Devendra Fadnavis makes serious allegations)

संसंदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना पंतप्रधान मोदी यांनी संधी दिली आहे. अशावेळी अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशानं अधिवेशनाचं कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही मीडिया हाऊसेसनी Pagasus च्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही. आपल्याकडे असलेल्या टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरजंच नाही, असं फडणवीसांनी म्हटलंय.

‘UPAच्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग’

दरम्यान, संबंधित विभागानं अशा बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे. लवकरच सत्य काय ते समोर येईल. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचा आरोप झाला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंह यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन चॅपिंग केल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर जे काम झालं आहे ते कायदेशीर झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉड्रिंग रोखण्यासाठी फोन टॅप झाल्याचं सांगितलं. तसंच ते योग्य असल्याचं समर्थनही केलं होतं. त्याचबरोबर फोन टॅपिंगची बातमी येणं चुकीचं असल्याचं सांगत, याबाबत यापुढे काळजी घेऊ असंही ते म्हणाले होते. UPAच्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीररित्या योग्य आहे हे देखील सांगण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

‘भारताला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र’

Pegasus मध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. मात्र चर्चा फक्त भारताचीच केली जात आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूनं हे सगळं केलं जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केलाय. एक-दोन मीडिया हाऊसला चायनिज फंडिग येत आहे. त्याद्वारे एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे. अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

तसंच जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत NSO च्या कोणत्याही यंत्रणा आम्ही वापरल्या नाहीत. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असं कधीही झालं नाही. काही परदेशी एजन्सी भारताला बदनाम करत आहेत. त्याचाच एक भाग आपण बनू नका, असं आवाहनही फडणवीसांनी यावेळी केलं आहे.

संबंधित बातम्या :

देशात कोणीही सुरक्षित नाही, संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला

Parliament Monsoon Session: ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले…

Chinese funding to 1-2 media houses in the country, Devendra Fadnavis makes serious allegations

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.