AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: “पदवी कोणी दिली, हे शोधावे लागेल” देवेंद्र फडणवीस यांचा दहा हजार मतं बाद झाल्यानंतर शिक्षक-पदवीधरांना टोला

CM Devendra Fadnavis Statements: मत बाद होत असेल, तर पदव्या कोणी दिल्या शोधावे लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टोलेबाजी केली. सांगलीतील कार्यक्रमात त्यांनी खडेबोल सुनावले.

Devendra Fadnavis: पदवी कोणी दिली, हे शोधावे लागेल देवेंद्र फडणवीस यांचा दहा हजार मतं बाद झाल्यानंतर शिक्षक-पदवीधरांना टोला
देवेंद्र फडणवीस यांचा शिक्षक-पदवीधरांना टोला
| Updated on: Oct 20, 2026 | 8:12 AM
Share

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मत बाद होण्याच्या प्रकारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर आणि शिक्षकांना चांगलाच टोला लगावला आहे. पदवीधर व शिक्षक निवडणुकीमध्ये मतदान लिहताना वेगवेगळी कलाकारी होते, त्यामुळे दहा हजार मत बाद होणार असतील तर मग पदवी कोणी दिली, हे शोधावे लागेल, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. महायुतीच्या उमेदवारांसाठी फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. त्यांनी मत बाद होण्यावरून मिश्किल टिप्पणी केली. तर इतर मुद्यांवरही या सभेत मतं मांडली.

मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिकांवरील बाद मतांचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस म्हणाले की, 10 हजार मते बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना कोणी पदवी दिले हे तपासावे लागेल. सांगली मध्ये पार पडलेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्यामध्ये बोलताना मतदान बाद प्रकारावरून देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दात पदवीधर आणि शिक्षकांना हे,खडेबोल सुनावले. त्यांच्या या वक्तव्याची सभेत जोरदार चर्चा झाली. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.

पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघात चुरस

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी असा सामना होत असताना अंडरकरंटही समोर आले आहेत. महायुतीकडून शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना, तर पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने शिक्षक मतदार संघासाठी जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघात हर्षदा जाधव-देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप यांचेही पारडे जड मानले जात आहे.

इथे सर्व विवेकानंद आलेत वाटतं

कोल्हापूरमध्ये उच्च आणि त्यांचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खोचक टोला चर्चेत आला आहे. इथे सर्व विवेकानंद आलेत वाटतं, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी घोषणेबाजीवरून केली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष