
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एटापल्लीतील हेडरी येथे पोलीस भगिनी व स्थानिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला भेट देऊन पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला.

याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यासमयी नक्षली कारवायांचा धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले.

पोलिस भगिनींना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.