अंगावर वीज पडून नांदेडमधल्या शेतकऱ्याचा मृत्यू, गावावर शोककळा

| Updated on: Jul 08, 2021 | 8:02 AM

मुदखेड तालुक्यातील मुगट इथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. 55 वर्षीय दत्ता ढेपाळे हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. या दुर्दैवी घटनेत ढेपाळे यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे मुगट गावावर शोककळा पसरलीय. (Farmer Datta Dhepale Death in mudkhed Nanded by lightining)

अंगावर वीज पडून नांदेडमधल्या शेतकऱ्याचा मृत्यू, गावावर शोककळा
55 वर्षीय दत्ता ढेपाळे हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली.
Follow us on

नांदेड : मुदखेड तालुक्यातील मुगट इथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. 55 वर्षीय दत्ता ढेपाळे हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. या दुर्दैवी घटनेत ढेपाळे यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे मुगट गावावर शोककळा पसरलीय. (Farmer Datta Dhepale Death in mudkhed Nanded by lightining)

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दुपारच्या सुमारास मुगट गावात अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबरच विजांचा कडकडाट देखील सुरु होता. शेतामध्ये दत्ता ढेपाळे आणि त्यांचा मुलगा होता. पाऊस आल्याने ते बैलाला घेऊन झोपडीकडे येत असताना दत्ता ढेपाळे यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात सायंकाळी 5 च्या सुमारास शवविच्छेदनासाठी त्यांची बॉडी नेण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.

बारा दिवसानंतर नांदेडमध्ये ‘पावसाचं कमबॅक’

नांदेड जिल्ह्यात सुमारे बारा दिवसानंतर पावसाचे पुनरागमन झालं. मध्यरात्रीपासून पावसाने नांदेड जिल्ह्यातील विविध भागात हजेरी लावली. जिल्ह्यात कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झालाय. पहाटेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे जिल्ह्यातील दुबार पेरणीचे संकट टळल असून पिकांना जीवदान मिळालंय. त्यामुळे खरीप हंगामावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

नागपूरमध्ये वीज अंगावर पडून 3 शेतकऱ्यांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. रामटेक तालुक्यातल्या चोरखुमारी शिवारातली ही घटना आहे. दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतातील झोपडीत आश्रयाला थांबलेल्या पाच शेतकरी मजूरांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दिलीप मंगल लांजेवार, मधुकर पंधराम आणि योगेश कोकण अशी तिन्ही मृतांची नावं आहेत. वीज अंगावर पडून एकाचवेळी या तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत दोन शेतकरी मजूर जखमी झालेत जखमींमध्ये बारा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(Farmer Datta Dhepale Death in mudkhed Nanded by lightining)

हे ही वाचा :

पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात, पिकांनी माना टाकल्या, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

पावसानं टेन्शन वाढवलं, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! 86 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण

वीज ‘काळ’ बनून आली, नागपुरात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे सुदैवाने बचावले