वीज ‘काळ’ बनून आली, नागपुरात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे सुदैवाने बचावले

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2021 | 7:43 AM

नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. रामटेक तालुक्यातल्या चोरखुमारी शिवारातली ही घटना आहे. (3 Farmer Death lighting Strike In nagpur Ramtek)

वीज 'काळ' बनून आली, नागपुरात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे सुदैवाने बचावले
नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.

Follow us on

नागपूर :  नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. रामटेक तालुक्यातल्या चोरखुमारी शिवारातली ही घटना आहे. दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतातील झोपडीत आश्रयाला थांबलेल्या पाच शेतकरी मजूरांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (3 Farmer Death lighting Strike In nagpur Ramtek)

दिलीप मंगल लांजेवार, मधुकर पंधराम आणि योगेश कोकण अशी तिन्ही मृतांची नावं आहेत. वीज अंगावर पडून एकाचवेळी या तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत दोन शेतकरी मजूर जखमी झालेत जखमींमध्ये बारा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर घटना काय…?

सविस्तर घटना अशी की, शेतात मशागतीची कामं सुरु असताना पाऊस सुरु झाल्यावर शेतातले काम करणारे शेतकरी मजूर झोपडीत आश्रयाला गेले. मात्र पाऊस सुरू असताना वीज कोसळल्याने वीज अंगावर पडून तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

रामटेक तालुक्यात चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरीसिंह सोडते यांची शेती आहे. त्यांच्याच शेतात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होती. काम सुरू असताना दुपारच्या वेळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतातील मजूर एका झोपडीत आश्रयाला थांबले. मात्र वीज काळ बनून आली आणि तिने शेतकऱ्यांचा जीव घेतला…

(3 Farmer Death lighting Strike In nagpur Ramtek)

हे ही वाचा :

अवकाळी पावसाचा फटका, हिंगोलीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI