Buldana School : शाळेत जायचंय चला उंटावरून! बुलडाण्यात पहिल्या वर्गाचे विद्यार्थी उंटावर बसून शाळेत, शेलोडी जिल्हा परिषद शाळेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

| Updated on: Jul 02, 2022 | 4:13 PM

शाळेचा पहिला दिवस त्यांच्यासाठी आठवण देणारा ठरणार आहे. अशा उपक्रमांमुळं विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. जिल्हा परिषदेच्या शाळा काही मागे नाहीत, हे दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

Buldana School : शाळेत जायचंय चला उंटावरून! बुलडाण्यात पहिल्या वर्गाचे विद्यार्थी उंटावर बसून शाळेत, शेलोडी जिल्हा परिषद शाळेचा नावीन्यपूर्ण उपक्रम
बुलडाण्यात पहिल्या वर्गाचे विद्यार्थी उंटावर बसून शाळेत
Follow us on

बुलडाणा : कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या संकटानंतर निर्भयपणे यावर्षीच्या नवीन शैक्षणिक सत्राला (Academic Session) सुरुवात करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गावातून उंटावरून मिरवणूक (Camel Procession) काढली. विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प तसेच चॉकलेट (Chocolate) देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षणाविषयी असलेली भीती दूर व्हावी. त्यांना शिक्षणाची ओढ लागावी, यासाठी शाळेच्या माध्यमातून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

शाळेचा पहिला दिवस यादगार

उंट सजविण्यात आला. मुलांमध्ये उत्साह दिसून आला. काही मुलं सुरुवातीला घाबरत होते. पण, नंतर त्यांनी मजा केली. या उपक्रमामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्येदेखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, त्याचबरोबर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थीही आनंदित दिसत होते. शाळेचा पहिला दिवस त्यांच्यासाठी आठवण देणारा ठरणार आहे. अशा उपक्रमांमुळं विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. जिल्हा परिषदेच्या शाळा काही मागे नाहीत, हे दाखविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

उंटावरून बसवून शाळेत

बुलडाण्यात शाळा प्रवेत्शोत्वस साजरा करण्यात आला. शाळांची सजावट करण्यात आली. बैलगाड्यांमधून विद्यार्थ्यांना आणण्यात आलं. प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेलोडी येथे नवीन उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना उंटावरून बसवून शाळेत आणण्यात आलं. विद्यार्थी पालकांत उत्साह दिसून आला. दोन वर्षांपासून विद्यार्थी शाळेपासून दूर होते. नवीन प्रेरणा, उत्साह दिसून येतो. जि. प. शाळांकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थी आनंदित होतात. त्यांना शिक्षणाची गोडी लागते. त्यांना शाळेत जावेसे वाटते. दोन वर्षांपासून घरी राहण्याची सवय बदलावी, यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

हे सुद्धा वाचा