Chandrapur Crafts | चंद्रपुरात सापडले पंचमुखी शिवलिंग, इतिहासात पडणार भर, काय आहे पंचमुखी शिवलिंगाचे महत्त्व?

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील भेजगाव येथील प्राचीन तलावाचे खोदकाम सुरू आहे. या तलावाच्या पारीवर देखणे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. मागील काही दिवसांपासून या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी येथे यमदेवाचे शिल्प मिळाले होते.

Chandrapur Crafts | चंद्रपुरात सापडले पंचमुखी शिवलिंग, इतिहासात पडणार भर, काय आहे पंचमुखी शिवलिंगाचे महत्त्व?
चंद्रपुरात सापडले पंचमुखी शिवलिंग
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 27, 2022 | 3:09 PM

चंद्रपूर : चंद्रपुरात पहिल्यांदाच पंचमुखी शिवलिंग (Shivling) शिल्प आढळले. तलाव खोदकामात दुसऱ्यांदा हे शिल्प सापडले. भेजगावातील तलावाचा खोदकामात दुर्मिळ पंचमुखी (Panchmukhi) शिवलिंगाचे शिल्प आढळून आले. जिल्ह्यात पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिल्प तलावाचा काठावर असलेल्या हेमांडपंथीय मंदिराचा गाभाऱ्यात ठेवण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी या तलावात यमदेवाचं शिल्प आढळून आले होते. पंचमुखी शिवलिंग सापडल्याने चंद्रपूरचा इतिहासात (History) अधिक भर पडली आहे. हे अत्यंत दुर्मिळ असं शिल्प आहे. अशा शिल्पाचं जतन व्हायला पाहिजे, असं अभ्यासकांना वाटतं. आढळलेले शिल्प हे पंचमुख शिवलिंगाचे आहे.

छोटेखाणी शिल्प पूजेसाठी देवघरात

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील भेजगाव येथील प्राचीन तलावाचे खोदकाम सुरू आहे. या तलावाच्या पारीवर देखणे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. मागील काही दिवसांपासून या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी येथे यमदेवाचे शिल्प मिळाले होते. बुधवारी खोदकामादरम्यान दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडले आहे. हे शिल्प अतिशय देखणे आहे. या शिल्पावर लाल पॉलीश मारलेली आहे. हे शिल्प पाच इंचाचे आहे. हे छोटेखाणी शिल्प पूजा अर्चा करण्यासाठी देवघरात ठेवले जात असे.

असे आहे पंचमुखाचे महत्त्व

पंचमुखी शिवलिंगावर भगवान शिवाचे पाच शिल्प कोरलेले असतात. शिवाचे पश्चिम मुख हे पृथ्वी तत्व म्हणून पूजले जाते. त्याचे उत्तर मुख हे जलतत्व म्हणून पूजले जाते. दक्षिण मुख हे तेजस तत्व म्हणून पूजले जाते. पूर्व मुख हे वायू तत्व म्हणून पूजले जाते. भगवान शिवाचे वरचे मुख हे आकाश मुख म्हणून पूजले जाते, असं अभ्यासक अरुण झगडकर यांनी सांगितलं. भेजगाव येथे तलावाचे खोदकाम करण्यात येत होते. त्यावेळी हे शिवलिंग सापडले. पंचमुखी शिवलिंग असल्यानं याबद्दल लोकांच्या मनात आस्था आहे. या पंचमुखी शिवलिंगाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मुखाचं एक वैशिष्ट असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं.