उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव, आता पुण्याच्या नामकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी

| Updated on: Jan 13, 2023 | 6:52 PM

बेंगळुरच नाव शहाजी महाराज ठेवावं. शहाजी महाराज यांनी बेंगळुरु शहर वसवलेलं आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे नाव जिजाऊ माता ठेवावं.

उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव, आता पुण्याच्या नामकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी
अमोल मिटकरी
Follow us on

अकोला : पुण्यात येरवडा उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. असं नाव देऊन भाजपाने अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनी संभाजी महाराज स्वराज्यरक्षक असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याचं नाव जिजाऊ माता ठेवावं, अशी मागणी केली. जिजामाता जन्मोत्सवाच्या वेळी अमोल मिटकरी म्हणाले की, पुण्याचं (Pune) नाव जिजाऊ ठेवावं. कारण शिवाजी महाराजांना सोबत घेऊन राजमाता जिजाऊ यांनी चारशे वर्षांपूर्वी मुरार जगदेवाची दहशत मोडून काढत महाराष्ट्रात एक शहर वसवलं. ज्याला आपण आता पुणे म्हणतो.

राजमाता जिजाऊ यांनी त्यावेळी राजेश्वराच्या साक्षीने स्वराज्याचे तोरण शिवारांच्या हातून बांधून घेतले. तर काल जिजामाता यांचा सव्वाचारशेवा जन्म महोत्सव सिंदखेड राजा येथे साजरा झाला. त्या ठिकाणी अनेकांनी आपली भावना व्यक्त करून दाखवली.

विरोध करणाऱ्यांना करू द्या

आता शहरांची नावे बदलली जात आहेत. त्याप्रमाणे पुण्याचं ही नाव हे जिजाऊ माता करावं अशी मागणी जनतेकडून होत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. ज्यांना विरोध करायचा ते करू द्या. कारण पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे.

तसेच बेंगळुरच नाव शहाजी महाराज ठेवावं. शहाजी महाराज यांनी बेंगळुरु शहर वसवलेलं आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे हे नाव जिजाऊ माता ठेवावं. ही मागणी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचेही यावेळी मिटकरी म्हणाले.

बावनकुळे यांचे भाषण मनोरंजनाचा विषय

चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे आणि इतर लोक झोपलेले होते. बावनकुळे साहेब काय बोलले याला महत्व नाही तर कसे बोलले याला महत्व आहे.

बावनकुळे साहेबांचे भाषण जर ऐकलं तर बाळा गाऊ कशी अंगाई. चित्रपटातील एक गीत आहे, निंबोळीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई…. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही….

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बावनकुळे यांचे भाषण सुरू असताना अक्षरशा स्टेजवर असलेली मंडळी ही झोपा काढत होती. त्यामुळे बावनकुळे हे आता महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा विषय झाला असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.