पोलीस विभागातील बायकोची हवी होती बदली, जे काही केले त्याने सारेचं चकित

अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागातून निघत नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका आली. त्यांनी सायबर विभागाकडे चौकशी सोपवली.

पोलीस विभागातील बायकोची हवी होती बदली, जे काही केले त्याने सारेचं चकित
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 4:11 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली :  बदल्यांसाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने सेटिंग लावतो. सरकारी नोकरीत पगार चांगला मिळतो. पण, जिथं बदली झाली तिथं काम करावे लागते. त्यामुळे वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतात. अशावेळी बदल्यांसाठी वेगवेगळ्या क्लुप्या केल्या जातात. अशीच एक क्लुप्ती एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी करण्यात आली.  गृहविभागाच्या सहसचिवांच्या नावे पोलीस अधीक्षकांना ई-मेलद्वारे दोन अंमलदारांच्या बदल्यांचे बनावट आदेश दिल्याचे धक्कादायक प्रकरण महिनाभरापूर्वी घडले होते. याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. हा बदली आदेश एका महिला अंमलदाराच्या पतीनेच पाठविल्याचे निष्पन्न झाले. आरोपी संदीप मड्डेलवार याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना ९ मे २०२३ रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई-मेल प्राप्त झाला होता.

नियमित ई-मेलवरून नव्हता मेल

यात पोलीस मदत केंद्र धोडराज येथील हवालदार जमीलखान पठाण यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नक्षल सेल आणि पोलीस मदत केंद्र गट्टाजाभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता. त्याखाली सहसचिव म्हणून व्यंकटेश भट यांचे नाव आणि स्वाक्षरी होती. गृहविभागाच्या नियमित ई- मेलवरून हा मेल आला नव्हता.

gad police 2 n

हे सुद्धा वाचा

पोलीस अधीक्षक यांना आली शंका

शिवाय अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागातून निघत नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका आली. त्यांनी सायबर विभागाकडे चौकशी सोपवली. उपनिरीक्षक सागर आव्हाड यांनी गृहविभागात जाऊन चौकशी केली असता हा मेल त्यांनी पाठवलाच नसल्याचे स्पष्ट झाले.

गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदवला

उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली ठाण्यात फसवणूक आणि माहिती–तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी तपासचक्रे गतिमान केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. बायकोची बदली हवी होती. त्यासाठी तिच्या नवऱ्याने अशी शक्कल लढवली होती.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.