Gopichand Padalkar: बैलगाडी शर्यतीसाठी पुन्हा मैदानात उतरुन सरकारची पळता भुई थोडी करु, गोपीचंद पडळकरांचा इशारा

| Updated on: Dec 07, 2021 | 2:11 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आम्ही जेव्हा पुन्हा बैलगाडी शर्यतीच्या (Bullock Cart Race) विषयात मैदानात उतरु तेव्हा सरकारची पळता भुई थोडी करू, असा इशारा राज्य सरकारला (State Government ) दिला आहे.

Gopichand Padalkar: बैलगाडी शर्यतीसाठी पुन्हा मैदानात उतरुन सरकारची पळता भुई थोडी करु, गोपीचंद पडळकरांचा इशारा
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
Follow us on

सांगली: भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आम्ही जेव्हा पुन्हा बैलगाडी शर्यतीच्या (Bullock Cart Race) विषयात मैदानात उतरु तेव्हा सरकारची पळता भुई थोडी करू, असा इशारा राज्य सरकारला (State Government ) दिला आहे. पशु संवर्धन मंत्र्यांनी 24 ऑगस्ट रोजी एक महिन्याच्या आत बैलगाडी शर्यत सुरू करतो अशी घोषणा केली होती.आता डिसेंबर सुरु आहे. मग ही बैठक फक्त राजकारणासाठी घेतली होती का, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी केला.

सरकारनं पोलीस बळाचा वापर करण्याचे उद्योग करु नये

गोपीचंद पडळकर यांनी जेव्हा आम्ही पुन्हा बैलगाडी शर्यतीच्या विषयात मैदानात उतरु तेव्हा सरकारची पळता भुई थोडी करु केल्याशिवाय राहणार नाही.तेव्हा सरकारने पोलीस बळाचा वापर करण्याचे उद्योग करु नयेत, असं म्हटलंय.बैलगाडी शर्यतीच्या विषयावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. ते सांगलीच्या आटपाडी मध्ये बोलत होते.

बैलगाडी शर्यत विषयात राज्य सरकारनं लक्ष घालावं

पशु संवर्धन मंत्र्यांनी 24 ऑगस्ट रोजी एक महिन्याच्या आत बैलगाडी शर्यत सुरू करतो अशी घोषणा केली होती.आता डिसेंबर सुरु आहे. मग ही बैठक फक्त राजकारणासाठी घेतली होती का, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. बैलगाडी शर्यतीच्या विषयामध्ये सरकारने ताबडतोब लक्ष घालावे, असंही ते म्हणाले.

सरकारनं शेतकऱ्यांची भावना समजून घ्यावी

झरे गावामध्ये 20 ऑगस्टला आम्ही बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या. आम्ही शर्यती घेतल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि 24 ऑगस्टला मंत्रालयात अनेक मंत्री आणि अनेक बैलगाडी चालक-मालक संघटनच्या बैठक झाली. बैलगाडी शर्यती सुरू करण्याच्या मागणीच्या बाबतीत महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणे गरजेचे आहे. 2012 पासून बैलगाडी शर्यती बंद झाल्या, गोवंश जपला पाहिजे गोवंशाचे संवर्धन झालं पाहिजे खिलार गाई नष्ट व्हायला लागली आहेत. बैलांची संख्या जवळजवळ 50 ते 60 टक्के घटली आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

इतर बातम्या:

Gopichand Padalkar | आता ओबीसी मंत्री कुठे आहेत? हे सर्व पवारांच्या ताटाखालचे मांजर : गोपीचंद पडळकर

VIDEO: अजित पवारांमुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द, पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar warn MVA Government over Bullock cart race