आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा भाजपला कडक शब्दांत इशारा, महायुतीला भेगा पडणार?

| Updated on: Jun 05, 2023 | 5:44 PM

आगामी काळातील निवडणुकीबाबत तानाजी सांवत यांनी सांगितले की, आम्ही जिकूंन आलेल्या 18 पैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. कारण आमचा गट वेगळा आहे, आणि आमचे अस्तित्वही वेगळे आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा भाजपला कडक शब्दांत इशारा, महायुतीला भेगा पडणार?
Follow us on

धाराशिव : राज्यातील आगामी काळातील निवडणुकांबाबत जोरदार हालचाली सुरु असतानाच महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युतीबाबत वेगवेगळ्या घटनामुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रच लढणार असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे काही मंत्री शिवसेनेच्या जागांवर हटून बसले आहेत. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीआधीच शिवसेना-भाजपमच्या युतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

कारण आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी थेट भाजपला इशारा देत ज्या जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत, त्या जागा आम्हीच लढविणार असून आम्हाला कुणीही गृहित धरू नये असा थेट इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भाजपला इशारा देताना त्यांनी सांगितले आहे की, आम्हाला कोणीही गृहित धरून सहज घेतले तर ते आम्ही मान्य करणार नाही.

त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री दिल्ली वारी करून भाजपबरोबर आगामी निवडणुकांबाबत बैठक घेत आहेत, तर दुसरीकडे मात्र शिवसेनेच्याच नेत्यांकडून भाजपला थेट इशारा देऊन आपापल्या जागांवर नेते मंडळी हटून बसली आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना -भाजप एकत्रच लढणार की, हे दोन्ही पक्ष आता वेगवेगळी चूल मांडणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले की, 2024 ची धाराशिव लोकसभा जागा शिवसेनाच लढवणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून या जागेबाबत भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडत आहेत.

त्यावरूनच हा वाद शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे. धाराशिव जागेमुळेच मंत्री तानाजी सावंत यांनी थेट भाजपला इशारा देत त्यांनी शिवसेनेच्या ज्या जिंकलेल्या जागा आहेत, त्या जागांवर शिवसेनेचेच उमेदवार असणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

आगामी काळातील निवडणुकीबाबत तानाजी सांवत यांनी सांगितले की, आम्ही जिकूंन आलेल्या 18 पैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. कारण आमचा गट वेगळा आहे, आणि आमचे अस्तित्वही वेगळे आहे.

आम्ही शिवसेना आहोत, पारंपरिक जागा आमच्याकडे आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव येथे भाजपचा खासदार होईल असं वक्तव्य केले होत, त्यावरून भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध रंगले आहे.