Akola Accident | अकोल्यात जेसीबी, पोकलँक मशीन चिखलात फसली, दार बंद झाल्याने मजूर जमिनीत पुरला, सकाळी मृतदेहचं सापडला!

| Updated on: Jun 18, 2022 | 11:42 AM

सचिन प्रसाद असं मृतकाचं नाव आहे. आज सकाळी सचिन यांचा मृतदेह सापडला. पोकलँड उचलली तेव्हा पोकलँडच्या आतमध्ये सचिनचा मृतदेह सापडला. त्याला पोकलँडचा दार बंद झाल्यानं बाहेर निघण्याची संधी मिळाली नाही.

Akola Accident | अकोल्यात जेसीबी, पोकलँक मशीन चिखलात फसली, दार बंद झाल्याने मजूर जमिनीत पुरला, सकाळी मृतदेहचं सापडला!
दार बंद झाल्याने मजूर जमिनीत पुरला
Follow us on

अकोला : राष्ट्रीय महामार्ग (National Highways) क्रमांक सहावर रस्ता निर्मितीचे काम सुरू आहे. बोरगाव मंजू पोलीस (Borgaon Manju Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा येथील याच महामार्गाच्या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाचा ठेका इगल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला. या महामार्गावरून जात असलेल्या रस्त्यावर पूल (Road Construction) निर्मितीचे काम सुरू आहे. येथे खोदकामाकरिता जेसीपी व पोकलँड याच्या सहाय्याने पायाभरणीचे काम सुरू होते. दोन दिवसांपासून रात्री मुसळधार पाऊस पडला. जमीन भुसभुशीत झाली आहे. रात्रीची वेळ होती. काम करून मजूर जेसीबी आणि पोकलँड मशीनवरच झोपले. पण, रात्री आलेल्या पावसामुळं जमीन भुसभुसीत झाली. यात पाण्याचा लोट वाहत आला. या लोटात मशीन पाण्याखाली फसल्या. फसलेल्या तीन मजुरांना बाहेर काढण्यात आलं. पण, पोकलँडमध्य जमिनीत फसलेल्या युवकाचा मृतदेहच सापडला.

तीन मजुरांना दोरीच्या साह्माने बाहेर काढले

जेसीपी व पोकलँडवर काम करणाऱ्या दोन मशीन पाणी व मातीच्या ढिगाऱ्यामध्ये पलटी झाल्या. या दोन्ही जेसीबी, पोकलँडसह मजूर काम करत होते. हे सुद्धा या पाण्यामध्ये फसले. याची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला देण्यात आली. रात्री झालेल्या या घटनेने काम करणारे मजूर फसले असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. गावकऱ्यांनी यातील तीन मजुरांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. परंतु बिहारमधील गोपालगंज तालुका करतारपूर येथील 18 वर्षीय सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद हा या मातीच्या ढिगार्‍यात अडकलेला होता. पोलीस तसेच नागरिक सदर युवकाला काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्याचा मृतदेह सकाळी सापडला.

नेमकं काय घडलं

सचिन प्रसाद असं मृतकाचं नाव आहे. आज सकाळी सचिन यांचा मृतदेह सापडला. पोकलँड उचलली तेव्हा पोकलँडच्या आतमध्ये सचिनचा मृतदेह सापडला. त्याला पोकलँडचा दार बंद झाल्यानं बाहेर निघण्याची संधी मिळाली नाही. दार जमिनीत दबलं. पाऊस सुरू होता. जेसीबीमधील तीन जणांना बाहेर काढण्यात आले. पण, सचिनचा आज सकाळी मृतदेह सापडला. पावसात मशीन फसल्यानं हा अपघात झाला. सचिनला काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण, तो जमिनीत दबला गेल्यानं त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा