ठरलं! एकनाथ खडसे यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील लढणार, मुक्ताईनगरात तगडी फाईट होणार; महाजन यांनी सांगूनच टाकलं

| Updated on: Dec 05, 2022 | 9:57 AM

कशाला आमच्या मुलापर्यंत पोहोचाता? बोलताना काही भान ठेवत चला. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आता तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोलत बसा.

ठरलं! एकनाथ खडसे यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील लढणार, मुक्ताईनगरात तगडी फाईट होणार; महाजन यांनी सांगूनच टाकलं
ठरलं! एकनाथ खडसे यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील लढणार, मुक्ताईनगरात तगडी फाईट होणार; महाजन यांनी सांगूनच टाकलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुक्ताईनगर: येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी भाजप एकवटली आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत खडसेंच्या विरोधात मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: भाजप नेते आणि राज्यातील महत्त्वाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल जाहीरसभेत जाहीर केलं. तसेच खडसे यांना तुमची ताकद असेल तर निवडून येऊन दाखवाच, असं आव्हानही एकनाथ खडसे यांना दिलं. त्यामुळे मुक्ताईनगरात विधानसभा निवडणुकीत तगडी फाईट होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणूक प्रचाराची काल सभा पार पडली. यावेळी गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारीच जाहीर केली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तुमच्या विरोधात उभे राहतील, असं सांगतानाच सभेतच गिरीश महाजनांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारले तुम्ही तयार आहात ना? त्यावर पाटील म्हणाले, होय, माझी तयारी आहे. त्यामुळे खडसे यांच्या समोर आगामी काळात चंद्रकांत पाटील यांचं आव्हान असणार आहे.

हे सुद्धा वाचा

यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाही चढवला. कधी म्हणत बसतात मी केलं, मी केलं. अहो, तुमच्यापेक्षा दहा हजार अधिक मतांनी केव्हाही निवडून आलो आहे. भाजपात असताना पक्षात सर्व तुम्ही केलं म्हणता, मग आम्ही काय केलं?, असा सवाल त्यांनी नाथाभाऊंना विचारला.

आज सर्वदूर भाजपचाचं बोलबाला आहे. लोकसभा, विधानसभा समोर आहे तुम्हाला दिसेलच. आता तुम्ही पुन्हा निवडणुकीत उभे राहून दाखवा. निवडून यावं, आता तुम्ही पक्ष बदलला आहे. आता बंड करा. आता तुम्ही पक्ष बदलला आहे, असंही ते म्हणाले.

भाजपमध्ये असताना तुम्ही म्हणायचा सर्व मीच केलं. भाजप मीच वाढवला. आता तुम्ही पक्ष बदलला आहे. आता निवडून येऊन दाखवा. खडसे म्हणतात आमदारकी मलाच पाहिजे, खासदारकी मलाच पाहिजे. जिल्हा बँक मलाच पाहिजे, दूध संघ मलाच पाहिजे, ग्रामपंचायत मलाच पाहिजे. सर्व घरात पाहिजे. पक्ष सोडल्यावर काय होतं हे तुम्हाला आता कळेल. सर्व पद भोगायचे आणि नंतर म्हणायचं पक्षाने मला काय दिलं? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

आता तुम्ही कितीही वल्गना करा. त्याचा काही उपयोग होणार नाही. दूध संघाचा तुम्ही काय विकास केला? लोकांना सर्व माहीत आहे. दूध संघात एकदा संधी मिळू द्या. या दूध संघाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात होईल. खडसेंना मतदारसंघातील मतेही मिळणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

नाथाभाऊंनी फक्त मी पणा केला. स्वार्थाशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. फक्त दुसऱ्याचे वाभाडे काढत फिरण्याचं काम ते करत आहेत. तुमच्याकडे सोन्याचे हांडे भरलेले होते काय? काय काय बोलताय तुम्ही. तुमची आता रिटायरमेंटची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

कशाला आमच्या मुलापर्यंत पोहोचाता? बोलताना काही भान ठेवत चला. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आता तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोलत बसा. तुमच्याविषयी मला आता जास्त बोलायचं नाही. मी आता बोलून दाखवणार नाही करून दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.