रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी, जिल्हाध्यक्षाची खरमरीत टीका

| Updated on: Jun 26, 2021 | 3:18 PM

Ramdas Athawale | रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजपशी युती केली तेव्हापासूनच आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्याविरोधात गेली आहे. पूर्वीचा पँथर वाघ असलेला रामदास आठवले आम्हाला नेता म्हणून हवा होता

रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी, जिल्हाध्यक्षाची खरमरीत टीका
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Follow us on

सिंधुदुर्ग: भाजपशी युती करुन उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या ‘रिपाइं’ला महाराष्ट्रातच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. रिपाईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी रामदास आठवले यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी लाचार झाले आहेत. असा लाचार झालेला नेता आम्हाला नको, अशा शब्दांत रतन कदम यांनी आठवले यांच्यावर तोफ डागली आहे. (RPI rebel leader takes a dig at Ramdas Athawale)

त्यामुळे आता रामदास आठवले स्वपक्षातील नाराजी दूर करण्यासाठी काय पावले उचलणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. रतन कदम यांनी थेट आणि बोचऱ्या भाषेत आठवले यांच्यावर प्रहार केला आहे. रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजपशी युती केली तेव्हापासूनच आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्याविरोधात गेली आहे. पूर्वीचा पँथर वाघ असलेला रामदास आठवले आम्हाला नेता म्हणून हवा होता, मंत्रिपदासाठी लाचार झालेला रामदास आठवले आम्हाला नकोय. आम्ही भाजपचं मिशन कमळ कधी ही यशस्वी होऊ देणार नाही, असे रतन कदम यांनी म्हटले.

…तर भाजपला जास्त मतं मिळवून देऊ; रामदास आठवलेंची जे.पी. नड्डांना ऑफर

रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. यावेळी आठवले यांनी पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी, असा प्रस्ताव मांडला होता. उत्तर प्रदेशात रिपाइंचे संघटन चांगले आहे. उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने आपल्याकडे वळविला आहे. मात्र, आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा आपल्याकडे वळवता येईल. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरपीआयला भाजपने सोबत घ्यावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशात आमच्यासोबत युती करा, भाजपला जास्त मतं मिळवून देऊ; रामदास आठवलेंची जे.पी. नड्डांना ऑफर

राजकारणात काहीही होऊ शकतं, पटोलेही आमच्यासोबत येतील: रामदास आठवले

2024 ला मोदीच, जनता पार्टीसारखा प्रयोग मोदींविरोधात होऊन देणार नाही- रामदास आठवले

(RPI rebel leader takes a dig at Ramdas Athawale)