राजकारणात काहीही होऊ शकतं, पटोलेही आमच्यासोबत येतील: रामदास आठवले

राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेस नेते नाना पटोले उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात. (nana patole can join nda says ramdas athavle)

राजकारणात काहीही होऊ शकतं, पटोलेही आमच्यासोबत येतील: रामदास आठवले
ramdas athavle

सांगली: राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेस नेते नाना पटोले उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकार जावं म्हणून आमचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. (nana patole can join nda says ramdas athavle)

सांगली येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आठवले एकाच मंचावर होते. यावेळी दोघांनीही एकमेकांची प्रचंड स्तुती केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आठवले यांना पटोलेंबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे सरकार लवकर जावं ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, एवढं मात्र खरं, असं आठवले म्हणाले.

तर राष्ट्रपती राजवटीचा विचार करावा लागेल

भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत आठवले यांना विचारलं असता, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये अशी आमची इच्छा आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ठाकरे सरकारने प्रयत्न केला पाहिजे. जर कायदा सुव्यवस्था बिघडत राहिली तर नाईलाजाने राष्ट्रपती राजवटीचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

नो कोरोना नो

देशातील दहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यातील आठ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहे. कोरोना वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने गंभीरपणे लक्ष द्यायला हवं, असं सांगतानाच पूर्वी मी ‘गो कोरोना गो’चा नारा दिला होता. आता जगातूनच कोरोना हद्दपार व्हावा म्हणून ‘नो कोरोना नो’चा नारा देत आहे, असं आठवले म्हणाले. (nana patole can join nda says ramdas athavle)

संबंधित बातम्या:

बाबुल सुप्रियोंसह चार खासदारांना विधानसभेचं तिकीट; बंगाल सर करण्यासाठी भाजपची खेळी!

वडिलांना आवाज आवडायचा नाही, रिक्षाही चालवली; आनंद शिंदेंचे किस्से वाचाच!

सहकार ते राजकारण; जाणून घ्या कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?

(nana patole can join nda says ramdas athavle)

Published On - 8:23 pm, Sun, 14 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI