उत्तर प्रदेशात आमच्यासोबत युती करा, भाजपला जास्त मतं मिळवून देऊ; रामदास आठवलेंची जे.पी. नड्डांना ऑफर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 24, 2021 | 2:30 PM

Ramdas Athawale meet JP Nadda | उत्तर प्रदेशात मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे.

उत्तर प्रदेशात आमच्यासोबत युती करा, भाजपला जास्त मतं मिळवून देऊ; रामदास आठवलेंची जे.पी. नड्डांना ऑफर
जे.पी.नड्डा आणि रामदास आठवले

नवी दिल्ली: पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी. उत्तर प्रदेशात रिपाईचे संघटन चांगले आहे. त्यामुळे मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे (बसपा) गेलेला दलित मतदारवर्ग भाजपकडे वळवता येईल, असे वक्तव्य रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. (Ramdas Athawale says BJP should form alliance with RPI in UP Assembly Election 2022)

रामदास आठवले यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. आगामी वर्षात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसदर्भात यावेळी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि रिपाइंचे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर हेदेखील उपस्थित होते.

रामदास आठवलेंचा प्रस्ताव काय?

उत्तर प्रदेशात मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे. उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले आहे. उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने आपल्याकडे वळविला आहे. मात्र, आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा आपल्याकडे वळवता येईल. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरपीआयला भाजपने सोबत घ्यावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

तसेच अन्य राज्यांमध्ये आरपीआयचे युनिट मजबूत आहे. अन्य राज्यांमध्ये काही जागा भाजपने आरपीआयला देऊन युती करावी. भाजप हा आरपीआयचा पार्टनर आहे.भाजपसोबत राष्ट्रीय पातळीवर आरपीआयची युती मजबूत आहे. मात्र, प्रदेश स्तरावर विधानसभा निवडणुकीत आरपीआयला जागा देऊन युती करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी जे.पी. नड्डा यांच्याकडे केली.

संबंधित बातम्या:

यूपीत 300 प्लसच्या नाऱ्यासह उतरणार भाजपा, सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न, एका फोटोची खास चर्चा

आरंभ झालाय, अजून लोक जोडले जातील, तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं विधान

जबरदस्ती धर्मांतर केल्यास रासुका लागणार, संपत्तीही जप्त होणार; योगी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

(Ramdas Athawale says BJP should form alliance with RPI in UP Assembly Election 2022)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI