VIDEO : जळगावात धावत्या ट्रकला आग, महार्गावर आगीचं रौद्ररुप

| Updated on: Nov 01, 2021 | 7:13 AM

ट्रकला आग लागल्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. ट्रकमध्ये धान्य भरण्याचे खाली पोत्यांचे गठ्ठे असल्याने मोठी आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

VIDEO : जळगावात धावत्या ट्रकला आग, महार्गावर आगीचं रौद्ररुप
truck Got Fire
Follow us on

जळगाव : जळगावात महार्गावर धावत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली. मानराज पार्क जवळील रेल्वे पुलावर हा अपघात घडला. रविवारी ही घटना घडली. तर दुपारच्या सुमारास महामार्गावर काही अंतरावर कारला आग लागली होती.

ट्रकला आग लागल्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. ट्रकमध्ये धान्य भरण्याचे खाली पोत्यांचे गठ्ठे असल्याने मोठी आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

दुपारी बर्निंग कारचा थरार

बांबोरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ कारला आग लागल्याची घटना घडली होती. महामार्गावर नागरिकांनी बर्निंग कारचा थरार अनुभवला. कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागलेल्या कारला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती.

यामुळे दोन्ही बाजूने महामार्गावरील ट्राफिक जॅम झालं होतं. नागरिकांच्या सतर्कतेने कारमधील चार जणांचे प्राण वाचले.

जळगाव-भुसावळ महामार्गावर कारला आग

तर, तीन दिवसांपूर्वी जळगाव-भुसावळ दरम्यान बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गोदावरी रुग्णालय जवळ एका कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून भस्मसात झाल. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

कारचे तापमान वाढल्याचे लक्षात येताच कार चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावून गाडीतील इतर प्रवाशांना खाली उतरवले. दरम्यान, त्याच वेळेस गाडीने अचानक पेट घेतला. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | तेजस्विनी बसची ट्रकला धडक, दादरमधील भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत कैद

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार