रोहित पवारांनी जामखेडकरांना दिलेला शब्द पाळला, पाणी पुरवठा योजनेसाठी 138.84 कोटी रुपयांची सुधारित मान्यता

| Updated on: Sep 02, 2021 | 3:02 PM

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडकर शहराचा बहुप्रलंबित पाणी प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 138.84 कोटी रुपये खर्चास मान्यता मिळालीय. राज्य सरकारने याबाबत सुधारीत खर्चासह प्रशासकीय मान्यता दिलीय.

रोहित पवारांनी जामखेडकरांना दिलेला शब्द पाळला, पाणी पुरवठा योजनेसाठी 138.84 कोटी रुपयांची सुधारित मान्यता
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडकर शहराचा बहुप्रलंबित पाणी प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 138.84 कोटी रुपये खर्चास मान्यता मिळालीय. राज्य सरकारने याबाबत सुधारीत खर्चासह प्रशासकीय मान्यता दिलीय. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली. तसेच यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जामखेडच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं.

रोहित पवार म्हणाले, “जामखेड शहराचा पाणी प्रश्न हा मतदारसंघात मोठा कळीचा मुद्दा बनला होता. 5 वर्षे मंत्रीपद आणि पालकमंत्री असतानाही प्रा. राम शिंदे यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या प्रचारात जामखेडला आले असताना त्यांनी ही योजना मंजूर झाल्याचे पत्र दाखवून निवडणुकीला हवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो केवळ निवडणूक फंडा असल्याचंच नंतर स्पष्ट झालें. मात्र मी आमदार झाल्यानंतर या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारीत तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली.”

“पंपाशिवाय तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पूर्ण दाबाने चढेल”

“मागील शासनाच्या काळात या योजनेचा केलेला प्रकल्प अहवाल हा खाजगी कन्सल्टंट मार्फत करण्यात आला होता आणि त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. जामखेड शहराचा जवळपास 40 टक्के भाग या योजनेतून वगळण्यात आला होता. तसेच अनेक भागात पूर्ण दाबाने पाणी पोचण्याबाबतही प्रश्नचिन्ह होते. ही बाब लक्षात आल्यानंतर नाशिकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्याकडील यंत्रणेमार्फत नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात आला. तो करत असताना जामखेडमधील नागरिकांना विश्वासात घेऊन शहरातील वगळलेल्या भागाचा या योजनेत समावेश केला. तसेच पंपाशिवाय तिसऱ्या मजल्यापर्यंत पूर्ण दाबाने पाणी चढेल, अशाप्रकारे या योजनेचा आराखडा तयार केला,” अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

“आगामी 2 वर्षात जामखेड शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावणार”

योजनेच्या नव्या सुधारित आराखड्यामुळे प्रकल्पाच्या किंमतीतही वाढ झाली. आमदार रोहित पवार यांनी या वाढीव प्रकल्पास तांत्रिक आणि नंतर मार्च 2020 मध्ये 106.99 कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळवली. परंतु डीएसआरच्या रेटमध्ये बदल झाल्यामुळे या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक होते. त्यानुसार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकामंत्री एकनाथ शिंदे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच जामखेड पाणीपुरवठा योजनेसाठी 138 कोटी 84 लाख इतक्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली. येत्या 2 वर्षात ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जामखेड शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. याबाबत जामखेडच्या नागरिकांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले आहे.

जामखेडच्या भगिनींना दिलेला शब्द पाळला : रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, “निवडणुकीच्या काळातच जामखेडच्या पाणीप्रश्नाची भीषणता लक्षात आली होती. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी येथील अनेक महिला भगिनींनी माझ्याकडे केली होती. मीही त्यांना शब्द दिला होता. आज शब्दपूर्ती करताना अत्यंत समाधान वाटत आहे. शहरातील कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही आणि ही योजना वेळेत पूर्ण करण्यात येईल. यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकासमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री या सर्वांचे मनापासून आभार.”

हेही वाचा :

जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सत्ताधारी एकवटले; रोहित पवार म्हणाले..

राज ठाकरे म्हणतात, राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार; रोहित पवारांनी पहिल्यांदाच दिलं जोरदार प्रत्युत्तर

खर्डा किल्ल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज; रोहित पवारांचा पुढाकार

व्हिडीओ पाहा :

NCP MLA Rohit Pawar comment on Jamkhed water scheme fund sanctioned by state government