AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खर्डा किल्ल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज; रोहित पवारांचा पुढाकार

नगर जिल्ह्यातील खर्डा येथील खर्डा (भुईकोट) किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून 74 मीटरचा मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. (india's tallest bhagwa flag will flutter in ahmednagar, says rohit pawar)

खर्डा किल्ल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज; रोहित पवारांचा पुढाकार
rohit pawar
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 2:25 PM
Share

नगर: नगर जिल्ह्यातील खर्डा येथील खर्डा (भुईकोट) किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून 74 मीटरचा मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. (india’s tallest bhagwa flag will flutter in ahmednagar, says rohit pawar)

अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किंवा शिवपट्टन किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. खर्डा किल्ल्याच्या याच कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. या किल्ल्यावर ध्वज फडकवण्याआधी तो देशातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला फिरवला जाईल. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2021 रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. हा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

अभिमानाचं प्रतीक

खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणाऱ्या देशातील किंबहुना जगातील सर्वांत उंच (74 मीटर) अशा भगव्या स्वराज्य ध्वजाचं उपस्थित संत-महंतांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यानंतर पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख 74 अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे. तिथं पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून 15 ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात अभिमानाने फडकविण्यात येणार आहे. हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणारच पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती याचं प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे. (india’s tallest bhagwa flag will flutter in ahmednagar, says rohit pawar)

संबंधित बातम्या:

आता शिवसेनाही टाकणार लेटरबॉम्ब, गडकरींना करणार सवाल; उदय सामंतांची माहिती

रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता, ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला; कपिल पाटील म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

उन-वारा-पावसात लाईटमनकडून सेवा, गावकऱ्यांकडून घोड्यावरुन मिरवणूक, सोन्या-नाण्याने सन्मान

(india’s tallest bhagwa flag will flutter in ahmednagar, says rohit pawar)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.