AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शिवसेनाही टाकणार लेटरबॉम्ब, गडकरींना करणार सवाल; उदय सामंतांची माहिती

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिल्यानंतर आता शिवसेनाही लेटरबॉम्बच्या तयारीत आहेत. (shiv sena will write to nitin gadkari over konkan issues, says uday samant)

आता शिवसेनाही टाकणार लेटरबॉम्ब, गडकरींना करणार सवाल; उदय सामंतांची माहिती
uday samant
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 1:12 PM
Share

सिंधुदुर्ग: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिल्यानंतर आता शिवसेनाही लेटरबॉम्बच्या तयारीत आहेत. कोकणातील रस्ते आणि विमानतळाच्या मुद्द्यावरून शिवसेना थेट गडकरींनाच पत्रं लिहिणार असून केंद्र सरकारची चालढकल त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. तसेच याबाबत काही प्रश्नही गडकरींना करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. (shiv sena will write to nitin gadkari over konkan issues, says uday samant)

टीव्ही 9 मराठीशी बोलताना उदय सामंत यांनी ही माहिती दिली. गडकरींच्या पत्रासंदर्भात योग्य की अयोग्य याचा निर्णय मुख्यमंत्री करतील. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधीच आता नितीन गडकरींना पत्र लिहिणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मधला जो 90 मीटरचा पॅच राहीला आहे तो कशामुळे राहीला आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहीजे. तसेच सिंधुदुर्गाचं विमानतळ पूर्ण होऊन देखील सुरू होत नाही हे कशामुळे थांबलंय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, केंद्र सरकार विमानतळ सुरू करण्याचा का निर्णय घेत नाही? कोणाच्या आदेशाची वाट बघतय का?, कोणाचा हस्तक्षेप होतोय का?, की कोणाचा दबाव आहे का? हे देखील समोर आलं पाहीजे, याबाबतची माहिती गडकरींना विचारण्यात येणार आहे, असं सामंत म्हणाले.

राणेंच्या टीकेने मते वाढतात

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. त्यावर बोलताना सामंत म्हणाले की, नितेश राणेंच्या टीकेला मी उत्तर देणार नाही. आमचे पदाधिकारी आणि शाखाप्रमुख त्यांच्या टीकेला उत्तर देतील. नितेश राणेंनी आजपर्यंत कोणावर टीका केली नाही? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा नितेश यांनी वैयक्तिक टीका केली होती. ते नेहमी आपल्या पेक्षा राजकीय उंची जास्त असलेल्या व्यक्तीवर टीका करतात. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करून त्या पंक्तीत मला बसवले आहे. त्याकडे मी सकारात्मकतेने बघतो, असा टोलाही त्यांनी लगावला. राणेंनी टीका केल्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आमची मते वाढतात हे आम्हाला पक्क माहीत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

राज्यपालांकडे अनेकदा पाठपुरावा

यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीवरही भाष्य केलं. राज्य सरकार याबाबत योग्य पाठपुरावा करत आहे. अनेकवेळा राज्यपालांना विनंती करून 12 सदस्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि पत्रं देऊनही विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांना विनंती केली आहे. उच्च न्यायालयानेही या संदर्भात राज्यपालांना आदेश देण्याचा अधिकार नसला तरी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे, असं मत नोंदवलं आहे. राज्यपालांनी हा प्रश्न अधिककाळ प्रलंबित ठेवू नये. कायदेशीरदृष्ट्या काही असेल तर मुख्यमंत्र्यांना कळवा, असंही कोर्टाने म्हटलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. (shiv sena will write to nitin gadkari over konkan issues, says uday samant)

संबंधित बातम्या:

तुम्ही एक दोन विदेशी कंपन्या विकत घेतलात तर देशहित कमी झालं? पीयुष गोयलांच्या टाटा समुहाबद्दलच्या वक्तव्यावर वाद

उन-वारा-पावसात लाईटमनकडून सेवा, गावकऱ्यांकडून घोड्यावरुन मिरवणूक, सोन्या-नाण्याने सन्मान

Afghanistan Crisis : नवा राष्ट्रपती थेट देशाचं नाव बदलण्याची चिन्हं, अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

(shiv sena will write to nitin gadkari over konkan issues, says uday samant)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.