रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता, ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला; कपिल पाटील म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

भाजप नेते आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज ठाण्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. (kapil patil's Jan Ashirwad Yatra' start from thane)

रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता, ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला; कपिल पाटील म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!
kapil patil

ठाणे: भाजप नेते आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज ठाण्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. प्रभू रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता. ठाण्याचा वनवास 74 वर्षांनी संपला. मोदींनी मला मंत्रिपद दिलं. मोदी है तो मुमकीन है, असं कपिल पाटील म्हणाले. (kapil patil’s Jan Ashirwad Yatra’ start from thane)

भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. आज ठाण्यातून कपिल पाटील यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली. ही जन यात्रा ठाणे आणि रायगड या भागात जाणार आहे. ज्यांच्यामुळे तुम्ही मंत्री म्हणून पोहचलात त्यांचे पाहिले आशीर्वाद घ्या, असं मोदींनी सांगितलं. म्हणूनच जनतेचा आशीर्वाद घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही काम करत आहोत. त्यासाठी उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण देशासाठी काम करायचंय

मोदींमुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. रामाचा वनवास हा 14 वर्षाने संपला होता. मात्र ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला आहे. खऱ्या अर्थाने हे मंत्री पद ठाण्याला मिळाले. त्यामुळे मोदी हे तो मुमकींन है… मला दिलेली जबाबदारी ही ठाण्यापुरती नाही संपूर्ण देशात काम करायचे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2014 पर्यंत मी भरकटलेलो होतो, आता नेमकी दिशा सापडली आहे, असंही ते म्हणाले.

सरकारने विचार करावा

यावेळी त्यांनी दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याच्या मागणीचं समर्थन केलं. दि. बा. पाटील हे नाव देण्याची मागणी ही माझी नाही. ही मागणी भूमिपुत्रांची आहे. त्याबाबत राज्य सरकारने विचार करावा आणि ते निश्चित विचार करतील असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

कपिल पाटलांचा झंझावात

ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदी आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागली आहे. तसेच केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला 27 मंत्रीपदे मिळाली आहेत. सर्व समाजाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. प्रथम केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेस ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून 16 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. येत्या 20 ऑगस्टला भिवंडी तालुक्यात त्यांच्या यात्रेची सांगता होईल. या दरम्यान कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, अलिबाग, रेवदंडा, पेन, पनवेल, उरण, नवी मुंबई, कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, किनवली, शहापूर आदी विविध भागातून यात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. (kapil patil’s Jan Ashirwad Yatra’ start from thane)

 

संबंधित बातम्या:

राणेंवर ‘मिशन 114’ची जबाबदारी, महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही; विनायक राऊतांचा राणेंवर जोरदार हल्ला

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवारपासून सुरुवात; ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथून शुभारंभ!

(kapil patil’s Jan Ashirwad Yatra’ start from thane)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI