लायकीत राहा, आमदार शेतकर्यांवर संतापले; कोल्हापूरात मोठा राडा, नेमकं काय घडलं?
Shivaji Patil on Farmers: शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य केल्याने शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड वादाच सापडले होते. आता कोल्हापूरातून अशीच एक बातमी समोर येत आहे. आमदार महोदयांनी शेतकर्यांना लायकीत राहा, असे म्हटल्याने एकच वाद पेटला.

Shivaji Patil on Farmers: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी वादग्रस्त विधान केलं. वाद उफाळल्यानंतर त्यांनी सारवासारव करत वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला आणि दिलगिरी व्यक्त केली. राज्यात दुष्काळाचे सावट असताना कोल्हापूरात पुन्हा एक वाद उफाळला. येथील आमदार महोदयांनी शेतकऱ्यांना थेट लायकीत राहा, असा दम भरल्याने वाद पेटला. शेतकरी आणि आमदारांच्या समर्थकात जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. आता या वक्तव्याने तीव्र नाराजी पसरली आहे. त्याचे राज्यात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
आमदार म्हणाले, लायकीत राहा
गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. तातडीने तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत करण्याची जोरदार मागणी केली. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आमदार शिवाजी पाटील चांगलेच संतापले. त्यांनी लायकीत राहा, असे थेट शेतकऱ्यांना सुनावले. आमदारांच्या या वक्तव्याने आंदोलनस्थळी मोठा राडा झाला.
आंदोलक शेतकरी हे घोषणा देत होते. त्यात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याविरोधात घोषणा देण्यात येत होत्या. त्या घोषणा ऐकल्यानंतर आमदार शिवाजी पाटील चांगलेच संतापले. त्यांनी लायकीत राहा असे आंदोलनकर्त्यांना सुनावले. या वक्तव्यानंतर आमदार शिवाजी पाटील समर्थक आणि शेतकरी यांच्यात राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी केली.
माफी मागा, शेतकर्यांची मागणी
शेतकरी, गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत करावा अशी मागणी करत होते. त्यासाठी आंदोलन सुरू होते. त्याठिकाणी घोषणाबाजी सुरू होती. आमदार शिवाजी पाटील यांनी शेतकर्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना शेतकर्यांना लायकीत राहा असे सुनावले. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले. आंदोलनकर्ते आणि आमदारांचे समर्थक आमने-सामने आले. आमदारांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी या मागणीसाठीही शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांची लायकी काढण्यावरून आंदोलनस्थळी मोठा वाद उद्भवला.
प्रांत कार्यालयावर मोर्चा
गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत करावा यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सोमवारी विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेकांनी तालुक्याला दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे. प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला आहे. तिथेच शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी आमदार शिवाजी पाटील यांनी भेट दिली आणि आपण दुष्काळी तालुक्यात गडहिंग्लजचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांमधून सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्यानंतर आमदार समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.