Taliye landslide: तळीयेत 35 महिला, 10 मुलांसह 50 जण अजूनही बेपत्ता; जिल्हाधिकारी निधी चौधरी घटनास्थळी

| Updated on: Jul 24, 2021 | 11:56 AM

महाडच्या तळीये गावात 35 गावकऱ्यांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 24 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. (Mahad landslinde)

Taliye landslide: तळीयेत 35 महिला, 10 मुलांसह 50 जण अजूनही बेपत्ता; जिल्हाधिकारी निधी चौधरी घटनास्थळी
Taliye Village
Follow us on

महाड: महाडच्या तळीये गावात 35 गावकऱ्यांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 24 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 35 महिला, 10 मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकाच्या सहाय्याने या ठिकाणी मदतकार्य सुरू असून बेपत्ता गावकऱ्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. ही घटना अकल्पनीय आणि अनेपक्षित होती, असंही चौधरी यांनी सांगितलं. (Maharashtra: At least 35 killed in Taliye landslide, 50 people missing yet)

महाडच्या तळीये येथील दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी या आज घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तळीयेच्या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 35 महिला, 10 मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसेच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे, असं सांगतानाच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखाची तर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार जखमीवर मोफत उपचार करणार आहे, असं चौधरी यांनी सांगितलं.

अकल्पनीय आणि अनपेक्षित घटना

ही अकल्पनीय आणि अनपेक्षित घटना होती. सायंकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. आम्हाला या घटनेची माहिती सायंकाळी 6.39 वाजता मिळाली. पण महाडला महापूर होता. त्यामुळे या गावाकडे येण्याचे सर्व मार्ग बंद होते. आम्ही नेव्ही आणि एअरफोर्सच्या संपर्कात होतो. एनडीआरएफच्याही संपर्कात होतो. पण खराब हवामान आणि पुरामुळे मदत पोहोचू शकली नाही. रोड ब्लॉक होते. तसेच खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकत नव्हतं. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांना मदत करू शकलो नाही. मात्र, स्थानिकांनी या ठिकाणी बचावकार्य करत 31 मृतदेह बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी रस्ते उघडल्यानंतर एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं.

दरड कोसळणाऱ्या गावांच्या यादीत तळीये नव्हतं

आम्ही जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांची यादी तयार केली होती. ज्या 9 गावांना दरड कोसळण्याचा प्रचंड धोका आहे, त्या गावांच्या यादीत तळीयेचा समावेश नव्हता. तसेच दरड कोसळण्याची शक्यता, सौम्य शक्यता असणाऱ्या गावांच्या यादीतही तळीयेचा समावेश नव्हता. तरीही ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना अत्यंत अनाकलनीय आणि अनपेक्षित अशीच होती, असं त्यांनी सांगितलं. पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याला सहा दिवसांपासून रेड अॅलर्ट देण्यात आला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Maharashtra: At least 35 killed in Taliye landslide, 50 people missing yet)

 

संबंधित बातम्या:

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

Maharashtra Rain Landslides LIVE | सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार, 10 हजार लोक स्थलांतर

माणसं बोंंबलली, मी बाहेर पडलो आणि होत्याचं नव्हतं झालं, तळीयेतील बबन सकपाळांची कहाणी

(Maharashtra: At least 35 killed in Taliye landslide, 50 people missing yet)