राज्यातील सर्व महामार्ग ग्रीन कॉरिडोअर करा; खासदार संभाजी छत्रपती यांची मागणी

राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर सर्वच यंत्रणा ठप्प होतात. एमर्जन्सी सुविधाही त्या भागांना पोहोचू शकत नाहीत. (sambhaji chhatrapati)

राज्यातील सर्व महामार्ग ग्रीन कॉरिडोअर करा; खासदार संभाजी छत्रपती यांची मागणी
खासदार संभाजी छत्रपती

कोल्हापूर: राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर सर्वच यंत्रणा ठप्प होतात. एमर्जन्सी सुविधाही त्या भागांना पोहोचू शकत नाहीत. संकटाच्या काळात नागरिकांना आवश्यक सुविधा तातडीने पोहोचवल्या जाव्यात यासाठी राज्यातील सर्व महामार्ग ग्रीन कॉरिडोअर केले पाहिजेत, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे. (Maharashtra government should frame policy on ‘Green Corridor’ to transport, says sambhaji chhatrapati)

कोल्हापूरमध्ये अनेक भागात पूर आला आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी संभाजी छत्रपती आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. सरकार आणि प्रशासन अॅलर्ट होतं. त्यामुळे 2019मध्ये कोल्हापूरमध्ये जी हानी दिसली ती आता दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की पुढच्या वर्षीच्या पुराची वाट पाहावी. यावर तोडगा काढण्यासाठी आपले हायवे ग्रीन कॉरिडोअर असावेत, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

पुलांची उंची वाढवा

रत्नागिरीला प्रचंड पूर आला. तिथे एमर्जन्सी निर्माण झाली आहे. पण टँकर किंवा आवश्यक गोष्टी तिथे पोहोचू शकत नाही. मग आपण कुठे चुकत आहोत? असा सवाल करतानाच आपण नॅशनल हायवे करायचं म्हणतो तर त्यात ग्रीन कॉरिडोअर असला पाहिजे, तरच अशा एमर्जन्सीत मदत पोहोचवणं शक्या होईल. कोल्हापूरचंच उदाहरण द्यायचं झालं तर शिरोळी पुलाजवळ सांगवी फाट्यावर ओव्हर ब्रीज असला पाहिजे. किनी टोलनाक्याजवळ काही केलं पाहिजे. आज कोकणाचा पूर्ण पट्टा बंद आहे हे चालणार नाही. आपल्याला रिमोर्ट सेन्सिंगच्या माध्यमातून सर्व गोष्टी मिळतात. पूर्वी या गोष्टी शक्य नव्हत्या. रिमोर्ट सेन्सिंगच्या माध्यमातून एक सर्व्हे करून पुलांची उंची कशी वाढवता येईल हे पाहिलं पाहिजे. दरवर्षी पूर येणारच. पूर आला पाच दिवस एमर्जन्सी आली तर काय करणार?, असा सवाल त्यांनी केला.

कोल्हापूरसाठी मास्टर प्लानिंग करा

कोल्हापूरचं नियोजन झालं पाहिजे. कोल्हापुरात जयंती नाल्यापासून एकूण सात पूल आहे. त्यातील शेळके पूल पावसाळ्यात सुरू असतो. बाकी सर्व पाण्याखाली जातात. पूर्वीच्या प्लानिंग नुसार ते बरोबर होतं. आता पुढे काय? त्यामुळे कोल्हापूरसाठी मास्टर प्लानिंग केलं पाहिजे. नाही तर दरवर्षी पूर येतच राहील. नुकसान होतच राहील. आता असं चालणार नाही. हे कोल्हापूरचं उदाहरण आहे. सर्व राज्यात या गोष्टी केल्या पाहिजे. धरणातील गाळ काढला पाहिजे. शहर वाढत आहे. वस्ती वाढत आहे. नद्यांमध्ये गाळ आहे. त्यावर पुन्हा नियोजन करण्याची गरज आहे. केवळ पावसामुळे हे परिणाम होत आहेत. धरणाचं पाणी सोडलं असतं तर किती अनर्थ झाला असता, असंही ते म्हणाले. (Maharashtra government should frame policy on ‘Green Corridor’ to transport, says sambhaji chhatrapati)

 

संबंधित बातम्या:

Weather Alert: राज्यातील पावसाचा जोर ओसरणार, 28 जुलैपर्यंत उसंत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणसाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले

(Maharashtra government should frame policy on ‘Green Corridor’ to transport, says sambhaji chhatrapati)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI