AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election 2021 : विधान परिषदेची रणधुमाळी, कोल्हापुरात पाटील- महाडिक गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

विधान परिषद अर्ज छाननीनंतर महाडिक-पाटील गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पागंवलं आहे.

Maharashtra MLC Election 2021 : विधान परिषदेची रणधुमाळी, कोल्हापुरात पाटील- महाडिक गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक
कोल्हापूरमध्ये पाटील महाडिक गट आमने सामने
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 2:00 PM
Share

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे पारंपारिक विरोधक अमल महाडिक यांच्यात ही लढत होतं आहे. कोल्हापूरमध्ये आज सतेज पाटील-महाडिक गट आमने-सामने आले.विधान परिषद अर्ज छाननीनंतर महाडिक-पाटील गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पागंवलं आहे. आज झालेल्या घटनेमुळं या निवडणुकीचं वातावरण तापू लागल्याचं दिसून आलं आहे.

कार्यकर्त्यांनी जमावबंदीचा आदेश झुगारला

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या कोल्हापूर जागेसाठी काँग्रेसनं सतेज पाटील यांना संधी दिलीय. तर भाजपकडून अमल महाडिक यांनी उमेदवारी देण्यात आलीय. पारंपारिक विरोधक या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा आमनेसामने आले आहेत. परिणामी कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापलं आहे. अर्ज छाननीची प्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले. जमावबंदीचा आदेश झुगारून कार्यकर्त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

मतांची आकडेवारी काय सांगते?

विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 421 मतदार आहेत. यातील पाच जण मयत असल्याने 416 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र करत 160 मत आहेत. तर, महाविकास आघाडी कडे जवळपास 250 मत आहेत. म्हणजेच विजयासाठी भाजपला आणखी 50 ते 60 मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकरांचा सतेज पाटील यांना पाठिंबा

शिरोळच्या येथील यड्रावकर गटानं विधान परिषदेसाठी अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सतेज पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर यड्रावकर गटानं निर्णय जाहीर केलाय. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू आणि जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यड्रावकर गट महाविकास आघाडीवर नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. विधान परिषद निवडणुकीतील निर्णयाक मतं यड्रावकर गटाकडं असल्यानं ते कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्षं लागलं होतं. अखेर सतेज पाटील यांना राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे.

इतर बातम्या:

Maharashtra MLC Election 2021 : राजेंद्र पाटील यड्रावकरांची नाराजी दूर करण्यात सतेज पाटलांना यश, भाजपचे अमल महाडिक उमेदवारी अर्ज भरणार

विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटलांना महाडिकांचे आव्हान; कोण आहेत अमल महाडिक?

Maharashtra MLC Election 2021 Satej Patil and Amal Mahadik supporters rada after scrutiny of forms

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.