Maharashtra MLC Election 2021 : राजेंद्र पाटील यड्रावकरांची नाराजी दूर करण्यात सतेज पाटलांना यश, भाजपचे अमल महाडिक उमेदवारी अर्ज भरणार

विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे पारंपारिक विरोधक अमल महाडिक यांच्यात ही लढत होतं आहे.

Maharashtra MLC Election 2021 : राजेंद्र पाटील यड्रावकरांची नाराजी दूर करण्यात सतेज पाटलांना यश, भाजपचे अमल महाडिक उमेदवारी अर्ज भरणार
सतेज पाटील, अमल महाडिक
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 11:31 AM

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे पारंपारिक विरोधक अमल महाडिक यांच्यात ही लढत होतं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार अमल महाडिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नाराजी दूर करण्यात सतेज पाटील यांना यश आलंय. त्यामुळं सतेज पाटील यांनी मतांच्या गणितात आघाडी घेतली असल्याचं बोललं जातंय.

राजेंद्र पाटील यड्रावकरांची मतं निर्णायक

शिरोळच्या येथील यड्रावकर गटानं विधान परिषदेसाठी अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सतेज पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर यड्रावकर गटानं निर्णय जाहीर केलाय. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू आणि जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यड्रावकर गट महाविकास आघाडीवर नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. विधान परिषद निवडणुकीतील निर्णयाक मतं यड्रावकर गटाकडं असल्यानं ते कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्षं लागलं होतं. अखेर सतेज पाटील यांना राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे.

अमल महाडिक आज अर्ज दाखल करणार

भाजपनं कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघासाठी अमल महाडिक यांना उमदेवारी जाहीर करत तगडा उमेदवार दिला आहे. अमल माहडिक आज उमेदावारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि मित्रपक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. भाजपचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी पंचशील हॉटेल येथे एकत्र येणार असल्याची माहिती आहे.

मतांची आकडेवारी काय सांगते?

विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 421 मतदार आहेत. यातील पाच जण मयत असल्याने 416 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र करत 160 मत आहेत. तर, महाविकास आघाडी कडे जवळपास 250 मत आहेत. म्हणजेच विजयासाठी भाजपला आणखी 50 ते 60 मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे.

इतर बातम्या:

कोल्हापुरात पुन्हा एकदा रंगणार महाडिक विरुद्ध पाटील सामना! भाजपकडून अमल महाडिक रिंगणात

विधानपरिषदेची हाय व्होल्टेज लढत, सतेज पाटील-अमल महाडिक आमने सामने, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.