AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेची हाय व्होल्टेज लढत, सतेज पाटील-अमल महाडिक आमने सामने, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासूनच या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे. शिवाय राष्ट्रवादी सोबतच यावेळी शिवसेनेची ही मदत सतेज पाटील यांना अपेक्षित आहे.

विधानपरिषदेची हाय व्होल्टेज लढत, सतेज पाटील-अमल महाडिक आमने सामने, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
सतेज पाटील, अमल महाडिक
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 6:11 PM
Share

कोल्हापूर: राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरु झालीय. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत कोल्हापूरच्या जागेची आहे. कारण, महाविकास आघाडीकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपनं अमल महाडिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक विरुद्ध पाटील असा सामना पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात रंगणार आहे.

सतेज पाटील राखणार गड की अमल महाडिक ठरणार वरचढ

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच हा सामना असेल.मात्र, यातही लक्षवेधी लढती असणार आहे कोल्हापूरच्या जागेसाठीची कारण या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील विरुद्ध महाडिक एक पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. महा विकास आघाडीकडून राज्यमंत्री सतेज पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच होम ग्राऊंड असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील या जागेसाठी भाजपनं देखील कंबर कसली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना धूळ चारणाऱ्या अमल महाडिक यांना या निवडणुकीत उतरवण्याचं भाजपनं निश्चित केलंय. त्यामुळे कोल्हापूरात अमल महाडिक विरूद्ध सतेज पाटील हा सामना पुन्हा एकदा रंगणार आहे.

सतेज पाटील यांना विजयाचा विश्वास

राज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासूनच या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे. शिवाय राष्ट्रवादी सोबतच यावेळी शिवसेनेची ही मदत सतेज पाटील यांना अपेक्षित आहे.त्यामुळं निवडणूक जाहीर होताच मतदारांच्या भेटी गाठींचा एक टप्पा देखील पाटील यांनी पूर्ण केला त्यामुळे त्यांना आपला विजय निश्चित वाटतोय..

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिह्यात पिछेहाट झाल्यानं अस्वस्थ असलेल्या भाजपनं या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय. आणि म्हणूनच पाटील यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या महाडिकांना रिंगणात उतरवलंय.राज्यात वाढलेली ताकद पाहता या जागेवर भाजपच विजयी होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि महाडिक कुटुंबीयांनी केलाय.

आकडेवारी काय सांगते?

एक नजर टाकूया या निवडणुकीच्या आकडेवारी वर या निवडणुकीसाठीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 421 मतदार आहेत. यातील पाच जण म्हणत असल्याने 416 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र करत 160 मत आहेत. तर, महा विकास आघाडी कडे जवळपास 250 मत आहेत. म्हणजेच विजयासाठी भाजपला आणखी 50 ते 60 मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे.

अमल महाडिक यांच्या उमेदवारीमुळं रंगत

सुरुवातीला सतेज पाटील यांच्यासाठी एक तर्फी वाटणारी ही निवडणूक अमल महाडिक यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे रंगदार आणि चूरशीची होणार आहे. त्यातच या निवडणुकीसाठी निर्णायक मताचा गठ्ठा असलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर महाविकास आघाडीवर नाराज आहेत. आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची किनार त्याला आहे. त्यामुळं यड्रावकरांच्या भूमिकेवरच उमेदवारांचा जय-पराजय अवलंबून असल्याचं मत राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी यांनी व्यक्त केलेय.

इतर बातम्या:

महाराष्ट्रात कायद्याचे नाही तर ‘काय ते द्या’चे राज्य; भ्रष्टाचार, वसुलीच्या आरोपासह फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

कोल्हापुरात पुन्हा एकदा रंगणार महाडिक विरुद्ध पाटील सामना! भाजपकडून अमल महाडिक रिंगणात

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.