कोल्हापुरात पुन्हा एकदा रंगणार महाडिक विरुद्ध पाटील सामना! भाजपकडून अमल महाडिक रिंगणात

विधान परिषदेच्या सहा जागांपैकी कोल्हापूरच्या लढतीची राज्यात सर्वाधिक चर्चा सुरु आहे. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपनं अमल महाडिक यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरात पुन्हा एकदा रंगणार महाडिक विरुद्ध पाटील सामना! भाजपकडून अमल महाडिक रिंगणात
सतेज पाटील, अमल महाडिक


कोल्हापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांपैकी कोल्हापूरच्या लढतीची राज्यात सर्वाधिक चर्चा सुरु आहे. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपनं अमल महाडिक यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. (BJP nominates Amal Mahadik against Congress’ Satej Patil for Kolhapur Legislative Council)

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील चर्चेनंतर निर्णय

भाजपकडून स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी अमल महाडिक यांचं नाव निश्चित झालेलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अमल महाडिक यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. केंद्रीय भाजपकडून आज सांयकाळी किंवा उद्या यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये अमल महाडिक आणि सतेज पाटील असा सामना रंगणार आहे.

सतेज पाटील आणि अमल महाडिक आमनेसामने

भाजपकडून अमल महाडिक यांचं नाव निश्चित झालं आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं आहे. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

कोल्हापूर विधान परिषदेसाठी 417 मतदार

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक वगळून होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी 420 मतदार आहेत. मात्र, जिल्हा परिषदेतील एक सदस्य अपात्र, तर एका सदस्याचं निधन झालं आहे. तसंच पन्हाळा नगरपालिकेतील एका स्वीकृत नगरसेवकाचं निधन झाल्यामुळे मतदारांची संख्या 417 वर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे ही यादी उद्या सादर केली जाणार आहे.

कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी महापालिकेतील 81 नगरसेवकाचं मतदान नाही. मात्र, नव्याने झालेल्या 5 नगरपालिकेतील निवडून आलेले नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक असे 99 सदस्य मतदानासाठी पात्र असतील.

इतर बातम्या :

काय सांगता? पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते, औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जावईशोध!

VIDEO: मोदींच्या अभिनंदनासह तीन ठराव, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू

BJP nominates Amal Mahadik against Congress’ Satej Patil for Kolhapur Legislative Council

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI