AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक, मतदान, मतमोजणी कधी ?

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे.

Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक, मतदान, मतमोजणी कधी ?
election image
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 5:01 PM
Share

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे.

विधानपरिषदेच्या सहा जागांवर होणार निवडणूक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यास्तव निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

 निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)

♦ नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)

♦ नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार)

♦ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक-26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार)

♦ मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार)

♦ मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

♦ मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार)

♦ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार) 

नियमांचे पालन करणे आवश्यक

आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी सांगण्यात आलेल्या मार्गदर्शक  सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक आहे.

आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश

भारत निवडणूक आयोगाने मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना उपरोक्त निवडणुकीसाठी कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने निवडणुकीचे संचलन तसेच आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असे उप सचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

दिग्गज उमेदवार मैदानात

स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.मुंबईतून रामदास कदम आणि भाई जगताप, कोल्हापूरमधून सतेज पाटील, धुळे नंदूरबार अमरिश पटेल, नागपूरमधून गिरीश व्यास, अकोला बुलडाणा वाशिममधील गोपालकिशन बाजोरिया यांचा सहा वर्षांचा कालावधी संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं देगलूर बिलोली निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

इतर बातम्या :

Most Earning Zodiac Sign| या राशीच्या व्यक्ती कमवतात बक्कळ पैसा, तुमची रास यात आहे का?

भेटीगाठी केल्या, कामाला आल्या, उदयनराजे भोसले जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध!

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक, 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

(MLC election schedule in maharashtra declared by election commission of india know all information)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.