AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मोदींच्या अभिनंदनासह तीन ठराव, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनासह तीन ठराव या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

VIDEO: मोदींच्या अभिनंदनासह तीन ठराव, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू
bjp meeting
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:47 AM
Share

मुंबई: भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनासह तीन ठराव या बैठकीत मांडण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महाराष्ट्रच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झाली आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवीही उपस्थित आहेत.

पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन हजेरी

या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे उपस्थित आहेत. कार्यकारिणी बैठकीस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे मुंबईत उपस्थित आहेत. तसेच विविध जिल्हास्थानी पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन पद्धतीने कार्यकारिणी बैठकीत सहभागी झाले आहेत.

आगामी वाटचालीची दिशा ठरवणार

या कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव मांडण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एक ठराव असेल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे समर्थन याविषयी एक ठराव असेल. महाविकास आघाडी सरकारकडून समाजाच्या सर्वच घटकांची फसवणूक झाली असून त्याची चर्चा राजकीय ठरावात करण्यात येणार आहे. राज्यातील विरोधी पक्ष म्हणून भाजपा प्रभावी कामगिरी करत आहे. पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आणि ठरावांद्वारे स्पष्ट होणार आहे.

महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार?

दरम्यान, पुढील वर्षी राज्यात मुंबई महापालिकेसह काही महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार असून मुंबई महापालिकेसाठी खास रणनीती केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

पराभव होताच हिमाचल भाजपमध्ये बंडाला सुरुवात; नेत्यांचा थेट राष्ट्रीय अध्यक्षांवरच निशाणा

अहमदाबादमध्ये आजपासून रस्त्याच्या कडेला मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या स्टॉलवर बंदी !

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच मिळणार ‘पीएम किसान’ योजनेचा दहावा हफ्ता

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.