विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटलांना महाडिकांचे आव्हान; कोण आहेत अमल महाडिक?

विधान परिषद मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांना संधी मिळाली आहे. काँग्रेस उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल, या संदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं.

विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटलांना महाडिकांचे आव्हान; कोण आहेत अमल महाडिक?
सतेज पाटील, अमल महाडिक
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 8:28 AM

कोल्हापूर : विधान परिषद मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांना संधी मिळाली आहे. काँग्रेस उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल, या संदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते.

कोण आहेत अमल महाडिक?

अमल महाडिक यांना कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे. महाडिक हे उच्चशिक्षीत उमेदवार असून, त्यांनी ‘एमएससी’पर्यंत शिक्षण घेतले आहे. महाडिक हे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. शिरोली मतदारसंघातून ते काँग्रेसमधून विजयी झाले होते. पंरतु काँग्रेसचे सध्याचे उमेदवार सतेज पाटील यांच्यासोबत असलेल्या वादामुळे त्यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी हुकली, इथूनच पुढे पाटील महाडिक  गटांमधील संघर्षाची धार आणखी वाढली.  2014 साली अमल महाडिक यांनी विधानसभा  निवडणुकीत राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटील यांचा अनपेक्षित पराभव केला, आणि ते आमदार झाले. दरम्यान 2019 साली त्यांना भाजपाकडून पुन्हा एकदा विधानसभेचे तिकीट देण्यात आले. मात्र यावेळी सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज  पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची

कोल्हापूर : अमल महाडिक

धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे

अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल

मुंबई : राजहंस सिंह

बावनकुळेंना अखेर विधानपरिषदेवर संधी

विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून डावलले गेलेले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अखेर संधी मिळाली आहे. दरम्यानच्या काळात बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र ते सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वीज बिल विरोधी आंदोलन यासारख्या अनेक आंदोलनांचं बावनकुळेंनी नेतृत्व केलं. त्यानंतर आता नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून बावनकुळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही.

संबंधित बातम्या 

Rajhans Singh | काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला भाजपचं तिकीट, विधानपरिषदेची संधी मिळालेले राजहंस सिंह कोण आहेत?

…अन् तुपकरांच्या आईने फोडला हंबरडा; माझ्या मुलाचे काही बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदार

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.