Marathwada Flood : नांदेड, हिगोली, परभणीसह मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पूर, जायकवाडीतील पाणी वाढणार

अनेक भागात पावसाचे पाणी घरात शिरले आहे. घारापुर, पळसपुर, सिरंजनी, डोल्हारी गावांकडे जाणाऱ्या पुलांवर पाणी आल्याने या गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी सचिन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Marathwada Flood : नांदेड, हिगोली, परभणीसह मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पूर, जायकवाडीतील पाणी वाढणार
नांदेड, हिगोली, परभणीसह मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पूर, जायकवाडीतील पाणी वाढणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 8:14 PM

नांदेड : मराठवाड्यात सध्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळेच आता जायकवाडी धरणाची (Jayakwadi Dam) पाणी पातळीही चांगलीच वाढली आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही फोनवरून या पूरस्थितीचा (Marathwada Flood) आढावा घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायत नगर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला असून पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गावांना जोडणाऱ्या अनेक नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटलाय. हिमायत नगर मध्ये सुमारे 2 तास मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. अनेक भागात पावसाचे पाणी घरात शिरले आहे. घारापुर, पळसपुर, सिरंजनी, डोल्हारी गावांकडे जाणाऱ्या पुलांवर पाणी आल्याने या गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी सचिन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू

नांदेडच्या अग्निशमन विभागाने बचावकार्य राबवत पुरात अडकलेल्या चौघांची सुखरूपणे सुटका केलीय, हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा इथे घराला पुराच्या पाण्याचा विळखा पडला होता, तसेच नांदेड जिल्ह्यातील आलेगाव इथे एक जोडपे पाण्यात अडकून पडले होते. अग्निशमन दलाने या दोन्ही ठिकाणी बोटीच्या मदतीने बचावकार्य राबवत या चौघांची सुखरूपणे सुटका केलीय. अग्निशमन दलाने राबवलेल्या या बचावकार्याचे नागरिकांनी टाळ्या वाजवत स्वागत केलंय.

धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता

गोदावरी नदीत पाण्याची अवाक मोठ्या प्रमाणात वाढली . विष्णुपुरी धरणाच पाणलोट क्षेत्र आणि वरच्या भागात देखील पाऊस झाला . त्यामुळे  पाण्याचा ओघ वाढला .आवक वाढल्याने विष्णूपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडन्यात आले . दोन दरवाजातून 812 क्युमेंस इतक्या वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे . पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दूथडी भरुन वाहत आहे . नांदेडला अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे आणखी दरवाजे उघडण्याची दाट शक्यता शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय.

लेंडी नदीला पूर

परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस होत आहे. होत असलेल्या पावसामुळे एकीकडे शेतकरी सुखावलाय, मात्र दुसरीकडे काही गावांना सतत होणाऱ्या या पावसाचा आता फटका बसताना दिसून येतेय. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात झालेला आहे,  त्यामुळे पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने तेरा गावांचा संपर्क तुटलेला आहे, तर दुसरीकडे आता गंगाखेड तालुक्यातील इंद्रायणी नदीला देखील पूल आल्याने गंगाखेड तालुक्यातील मुळी , धसाडी , अंगणगाव सहित जवळपास दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे .

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.