अरे बाबा… बाप चोरला तर पोलीस ठाण्यात तक्रार करा; आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले

उंदरासाठी सभेत जागा नसेल. मी शिवसैनिकांनी विनंती करणार आहे. शांतता ठेवण्यास सांगणार आहे. महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. त्यापेक्षा राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करावं, असा टोला त्यांनी लगावला.

अरे बाबा... बाप चोरला तर पोलीस ठाण्यात तक्रार करा; आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Apr 23, 2023 | 10:49 AM

जळगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी पाचोरा येथे जाहीर सभा आहे. या प्रचारसभेपूर्वीच पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेला 25 हजारापेक्षा अधिक लोक जमणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी जादू नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला… माझा बाप चोरला… अरे बाबा तुमचा बाप चोरला गेला असेल पोलिसात तक्रार द्या; अशी खोचक टीका किशोर पाटील यांनी केली आहे.

पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांची आजची सभा माझ्याविरोधा नाही. ही सभा माझ्याविरोधात नसून माझे काका, माझ्या राजकीय गुरुच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आहे. माझ्या विरोधातील सभा असेल तर माझी प्रतिक्रिया वेगळी असेल. आज ते माझ्या काकांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचं मी स्वागत करेल. या सभेला कोणताही गालबोट लागणार नाही, असं किशोर पाटील यांनी स्पष्ट केलं.

तर राजकारण सोडेन

उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बाळासाहेबांसारखी जादू नाहीये. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी ताकद असती तर त्यांनी 288 मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. तसेच सर्वच सभांमधून उमेदवार निवडून आणले असते. असे 50 आणि 50 आमदारांवर ते थांबले नसते. त्यामुळे त्यांच्या इतकी काही जादू नाहीये. त्यांची भाषणं तीच तीच आहेत. माझा बाप चोरला… माझा बाप चोरला. अरे बाबा… बाप चोरला हे माहीत आहे, कुणी चोरला हे माहीत आहे तर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार द्या ना, असं डिवचतानाच उद्धव ठाकरे यांच्या सभेला 25 हजारापेक्षा जास्त लोक जमणार नाहीत. 25 हजाराच्यावर 26 हजारावी खुर्ची आली तर मी राजकारण सोडून देईल, असंही त्यांनी सांगितलं.

ताई हवेत

उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होणार नाही. माझ्या काकांच्या नावाचा राजकारणत वापर केला जात आहे. ते आजारी असताना विचारपूस केली नाही. आता ते शाखा प्रमुखाची सुद्धा भेट घेत आहेत. माझी ताई आधी उद्धव ठाकरे यांना शिव्या घातल होती. आता ती कडवट शिवसैनिक झाली आहे. माझी ताई हवेत आहे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us