Sanjay Biyani Murder : संजय बियाणी हत्याकांडातील आणखी तीन आरोपींवर मोक्का, एकूण 12 आरोपींना अटक

आज नांदेडमधील पौर्णिमानगर येथून रणजित मांजरमकर याला अटक करण्यात आली. त्यानेच बियाणी यांच्या घराची रेकी केली होती आणि मारेकऱ्यांना शस्त्र पुरवले होते. आज या तीन आरोपींना पाच दिवसाची कोठडी मोक्का न्यायालयाने सुनावली.

Sanjay Biyani Murder : संजय बियाणी हत्याकांडातील आणखी तीन आरोपींवर मोक्का, एकूण 12 आरोपींना अटक
संजय बियाणी हत्या प्रकरणातील दुचाकीच्या मालकाला अटक
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 8:04 PM

नांदेड : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्याकांडातील आणखी तीन आरोपींवर मोक्का (Mocca) लावण्यात आला आहे. यापूर्वी 9 जणांना अटक करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी आणखी दोन आरोपी मध्य प्रदेशमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज नांदेडमधील पौर्णिमानगर येथून रणजित मांजरमकर याला अटक (Arrest) करण्यात आली. त्यानेच बियाणी यांच्या घराची रेकी केली होती आणि मारेकऱ्यांना शस्त्र पुरवले होते. आज या तीन आरोपींना पाच दिवसाची कोठडी मोक्का न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात आतापर्यत 12 जण अटकेत आहेत. गोळीबार करणारे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

याआधी अटक केलेल्या 9 आरोपींच्या कोठडीत वाढ

बियाणी यांच्या हत्येप्रकरणी याआधी 9 आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी त्यांची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करत त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला. तसेच त्यांच्या कोठडीत पुन्हा सात दिवसांची वाढ करण्यात आली. त्यानंतर मध्य प्रदेशातून दोन आणि नांदेडमधील एक अशा आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. आतापर्यंत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.

खंडणीसाठी झाली होती संजय बियाणी यांची हत्या

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर 5 एप्रिल रोजी त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडण्यात होत्या. या गोळीबारात बियाणी गंभीर जखमी झाले होते. कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत बियाणींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी दोन महिने तपास केल्यानंतर याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली. मात्र अद्यापही गोळीबार करणारे दोघे जण हाती लागले नाहीत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. (Mocca on three more accused in nanded Sanjay Biyani murder case)