Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट करणं भोवलं, ठाण्यात आणखी एकाला बेड्या

या प्रकरणानंतर पोलिसांनाही चांगलाच धक्का बसला आहे. आधीच देशभर या घटनेने राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रातही अनेक लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहाला मिळाले. त्यातच या प्रकरणाने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. 

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट करणं भोवलं, ठाण्यात आणखी एकाला बेड्या
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट करणं भोवलं, ठाण्यात आणखी एकाला बेड्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 5:25 PM

ठाणे : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबरांबाबत (mohammad paigambar)एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर देशातला माहौल पुन्हा तापला. यावरून देशातलं राजकारण तापलं असतानाच हे प्रकरण ठाण्यातल्या एक वक्तीला चांगलेच भोवलं आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी (Thane Police) मंगळवारी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली.या हॅकर्सने महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांच्या वेबसाइटला हॅक करून धार्मिक मसेज व्हायरल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी वेबसाइट पूर्ववत झाली. मात्र या प्रकरणानंतर पोलिसांनाही चांगलाच धक्का बसला आहे. आधीच देशभर या घटनेने राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रातही अनेक लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहाला मिळाले. त्यातच या प्रकरणाने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.

केंद्र सरकारच्या यंत्रणांनाही माहिती पुरवली

महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी मंगळवारी सांगितले की आम्ही संभाव्या सायबर धोका ओळखून केंद्र सरकारची नोडल एजन्सी सीईआरटी-इन (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) यांना याबाबत माहिती दिली आहे. हा प्रकार केवळ विकृती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि हकालपट्टी नेते नवीन जिंदाल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये निदर्शने झाली.विशेष म्हणजे काही मुस्लिम राष्ट्रांनी राष्ट्रांनी प्रेषितांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला.

देशभरातील पोलिसांना अलर्ट जारी

गृह मंत्रालयाने शुक्रवारीची अलर्ट जारी करत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांना संभाव्य धोके ओळखून तायरीत राहण्याचे आदेश दिले आहेत. देशातील हिंसाचाराच्या अनेक घटनांनंतर शुक्रवारी एमएचएने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पोलिसांना निवेदन जारी केले. गेल्या काही दिवसांत झालेल्या अनेक मोर्चांवेळी अनेक हिंसाचाराचेही प्रकार घडले आहेत. भाजपने फक्त नुपूर शर्मा यांना निलंबित करून काही होणार नाही तर त्यांच्यावर ठोस पोलीस कारवाई करवी, अशीही मागणी होत आहे. तसेच देशभरात अनेक ठिकाणी नुपूर शर्मांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे बिहारमधील काही हिंदू संघटना या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. नुपूर शर्मांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्ही शंभर कोटी जनतेला झेलू शकणार नाही, असा थेट इशाराच या हंदू संघटनांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.