शिवभोजन केंद्राचं अनुदान 5 महिन्यांपासून अडकलं; ठाकरे सरकारची महत्त्वाची योजना बंद पडण्याच्या दिशेनं

| Updated on: Dec 19, 2021 | 2:05 PM

राज्यातील शिवभोजन केंद्र (Shivbhojan Kendra) संचालक अडचणीत आले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडलं असल्याचं समोर आलंय.

शिवभोजन केंद्राचं अनुदान 5 महिन्यांपासून अडकलं; ठाकरे सरकारची महत्त्वाची योजना बंद पडण्याच्या दिशेनं
शिवभोजन केंद्र
Follow us on

चंद्रपूर: राज्यातील शिवभोजन केंद्र (Shivbhojan Kendra) संचालक अडचणीत आले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडलं असल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडी सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते.मात्र, हळूहळू यातील अनुदान बंद होत गेल्याने संचालकांनी केंद्र सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोलताना राज्यात सरकार आहे का?असा प्रश्न विचारला आहे.

शिवभोजन केंद्र बंद पडल्यास गरीब-गरजू नागरिकांची अडचण

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना बंद पडण्याची चिन्हे आहेत. गाजावाजा करून सुरू केलेली ही योजना अनुदान मिळत नसल्याने सुरू ठेवण्यास केंद्र संचालकांनी असमर्थता दर्शविली आहे. तातडीने यावर उपाय न शोधल्यास गरीब-गरजू नागरिकांची अडचण होणार आहे.

पाच महिन्यांपासून अनुदान रखडलं

राज्यातील शिवभोजन केंद्र संचालक सध्या अडचणीत सापडले आहेत. गेले पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे अनुदान रखडले आहे. चंद्रपूरसह राज्यभरात हीच स्थिती आहे. सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे आहे. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते. मात्र आधी 15 दिवसानी मिळणारे अनुदान नंतर महिना 5 महिन्यावर गेले आहे.

शिवभोजन योजना बंद पडणार होती

ही योजना बंदच पडणार होती. कारण शेतकरी- विद्यार्थी आणि राज्यातील सर्वच घटकांना या सरकारने कुठलाही दिलासा दिलेला नाही. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर टीका करताना राज्यात सरकार आहे का?असा प्रश्न विचारला आहे.

आधीच कोरोना काळात राज्यातील जनतेचे आर्थिक गणित बिघडले आहे. हजारो हातांना काम उरलेले नाही. त्यातच गरीब गरजू घटकांना आवश्यक असलेली ही योजना बंद झाल्यास मोठे संकट ओढवणार आहे.

इतर बातम्या:

Eknath Khadse : गुलाबराव पाटलांनी 30 वर्षांचा हिशोब काढला, 40 वर्षात एकदाही हरलो नाही, एकनाथ खडसेंनी दाखवला आरसा

Nagpur Congress | पालकमंत्र्यांनीच काढले महागाईविरोधात पदयात्रा; नितीन राऊत यांची केंद्रावर टीका

MVA Government Shivbhojan Kendra owners facing problems due to not get subsidy from government