Nagpur Congress | पालकमंत्र्यांनीच काढली महागाईविरोधात पदयात्रा; नितीन राऊत यांची केंद्रावर टीका

केंद्र सरकारने पेट्रोल–डिझेल आणि गॅस या इंधनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केल‍ा. बेझनबाग, दहा नंबर पुलिया, आवळे बाबू चौक, कमाल चौक, इंदोरा परिसरात ही पदयात्रा काढण्यात आलीय.

Nagpur Congress | पालकमंत्र्यांनीच काढली महागाईविरोधात पदयात्रा; नितीन राऊत यांची केंद्रावर टीका
पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह पदयात्रेत सहभागी झालेले नागरिक.
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 1:39 PM

नागपूर : महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसनं पदयात्रा काढली. या पदयात्रेत पालकमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. यावेळा नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सिलिंडर गॅसचे दर भरमसाठ वाढले. गृहिणींनी घरचे बजेट कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. सिलिंडरचे पोस्टर्स झडकविण्यात आले.

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

वाढता महागाईमुळे केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन बेहाल केले, असा आरोप करत काल महागाईविरोधात नागपुरात काँग्रेसने पदयात्रा काढली. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्त्वात ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय.

इंदोरा परिसरातून काढली पदयात्रा

केंद्र सरकारने पेट्रोल–डिझेल आणि गॅस या इंधनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केल‍ा. बेझनबाग, दहा नंबर पुलिया, आवळे बाबू चौक, कमाल चौक, इंदोरा परिसरात ही पदयात्रा काढण्यात आलीय.

बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी

पदयात्रा बेझनबाग येथून निघून बाबू चौक, कमाल चौक मार्गे परत बेझनबागमध्ये आली. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारनं महागाई आणि बेरोजगारीबाबत नागरिकांना दिलासा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पदयात्रेत इंधन व गॅस दरवाढीचे निषेध करणारे फलक उंचावण्यात आले. आंदोलनात राजेंद्र करवाडे, कृष्णकुमार पांडे, अनिल नगरारे, रत्नाकर जयपूरकर, ठाकूर जग्यासी, सुरेश जग्यासी, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, मुलचंद मेहर, दिनेश यादव, नेहा राकेश निकोसे, परसराम मानवटकर आदींनी सहभाग घेतला.

Gondia | लघवीला गेलेल्या पाहुणीवर अंधारात काळ, जंगलात नेऊन सहा नराधमांचा बलात्कार; सर्व आरोपींना अखेर जन्मठेप

Wardha | बाप बाप असतो! ‘पिल्लू’ दुर्धर आजाराने गंभीर, डॉक्टरांची कसोटी, बापाचा ‘रुद्र’ अवतार

Nagpur Tourism | नागपूरकरांनो नव्या वर्षात फिरायचंय? चला तर मग सैर करून येऊया शहराची…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.