Nagpur ACB | जलसंधारण विभागातून बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी मागितली 81 लाखांची लाच, चंद्रपुरात 50 लाख घेताना तीन अधिकारी जाळ्यात

या तिघांनी मिळून 81 लाख 2 हजार 536 रुपये लाचेची मागणी केली होती. 2 व 3 मे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळणी केली. 50 लाख रुपये घेताना तीन मे रोजी अटक करण्यात आली.

Nagpur ACB | जलसंधारण विभागातून बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी मागितली 81 लाखांची लाच, चंद्रपुरात 50 लाख घेताना तीन अधिकारी जाळ्यात
ब्रम्हपुरी येथे एसीबीनं लाचखोरांना अटक केली.
Image Credit source: t v 9
निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 04, 2022 | 10:23 AM

चंद्रपूर : 50 लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे (Water Conservation Department) 3 क्लास वन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडले. ब्रम्हपुरी येथे 50 लाखांची लाच स्वीकारताना श्रावण शेंडे (वय 46), प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना काल रात्री अटक करण्यात आली. सोबतच नागपूर येथून कविजीत पाटील (वय 32) प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (Water Conservation Office Nagpur) आणि चंद्रपूर येथून रोहीत गौतम (वय 35) लेखाधिकारी जलसंधारण कार्यालय यांना देखील अटक करण्यात आली. या प्रकरणात तक्रारदाराने नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम केले होते. या कामाचं बिल काढण्यासाठी या तीनही अधिकाऱ्यांनी 81 लाखांची मागणी केली होती. त्यासाठी 50 लाखांची रक्कम स्वीकारताना नागपूर येथील ACB च्या पथकाने कारवाई केली. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये (Bramhapuri Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तीन अधिकाऱ्यांनी 81 लाख रुपये मागितली लाच

तक्रारदार नागपुरातील 46 वर्षीय व्यक्ती आहे. कविजीत पाटील हा जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण कार्यालयात कार्यरत आहे. श्रावण शेंडे हा उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून चंद्रपुरात मृद व जलसंधारण कार्यालयात कार्यरत आहे. तर तिसरा अटकेतील आरोपी रोहीत गौतम हा विभागीय लेखाधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील मृद व जलसंधारण कार्यालयात कार्यरत आहे. या तिघांनी मिळून 81 लाख 2 हजार 536 रुपये लाचेची मागणी केली होती. 2 व 3 मे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळणी केली. 50 लाख रुपये घेताना तीन मे रोजी अटक करण्यात आली. तक्रारदाराने मृद व जलसंधारण कार्यालय नागपूर व चंद्रपूर येथे कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम केले. या केलेल्या कामाच्या बिलाची वितरित केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरित करण्याकरिता 81 लाख रुपयांची लाच मागण्यात आली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सापळा रचून पोलीस निरीक्षक सचिन मते, पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरूनुले, पोलीस हवालदार संतोष पंधरे, विकास सायरे, सारंग बालपांडे, सुशील यादव, बबिता कोकर्डे, गीता चौधरी, अस्मिता मेश्राम, करुणा सहारे, हरीश गांजरे, अमोल भक्ते, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, नरेश नन्नवरे, अमोल सिडाम, पुष्पा काचोरे, सतीश सिडाम यांनी ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें