भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक, वीज निर्मिती केंद्रांना फटका

विदर्भात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कॉल फील मध्ये पावसाचे पाणी शिरून कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटका महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे.

भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक, वीज निर्मिती केंद्रांना फटका
bhusaval thermal plant

जळगाव : विदर्भात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कॉल फील मध्ये पावसाचे पाणी शिरून कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटका महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे. भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 7 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असणे अपेक्षित असताना केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दिपनगरमधील तीन पैकी एक वीज निर्मिती संच बंद करण्यात आला आहे, अशी माहिती दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिली आहे.

पावसाने कोळशाच्या खाणीत पाणी, कोळसा उत्पादनावर परिणाम

राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस सुरु असून विदर्भातील चंद्रपूर विभागात असलेल्या कोळशाच्या खाणीत पाणी शिरल्याने याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला आहे. विदर्भातील कोळशाच्या खाणी मधून वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवला जातो. मात्र कोळशाच्या उत्पादनात घट झाल्याने राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना अत्यंत कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत आहे.

भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक

भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 1लाख 12 हजार मेट्रिक टन असा 7 दिवसांचा कोळसा साठा अपेक्षित असताना केवळ एक दिवस पुरेल एवढा 16 हजार मेट्रिक टन कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर मधील तीन वीज निर्मिती संचापैकी 210 मेगावॅटचा संच बंद करण्यात आला आहे.

कोळसा पुरवठा खंडित झाल्यास वीज निर्मिती ठप्प होण्याच धोका

दरम्यान, दररोज गरजेनुसार कोळसा उपलब्ध होत असल्याने तूर्तास तरी वीज निर्मितीवर परिणाम झाला नसला तरी एक दिवसही कोळसा पुरवठा खंडित झाल्यास दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील निर्मिती ठप्प होण्याचा धोका वाढला आहे.

कोणत्या जिल्ह्यात कधी व कसा पाऊस?

दिनांक 23 सप्टेंबरः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 24 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 25 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 26 सप्टेंबर: जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 27 सप्टेंबर: औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

(One day coal reserves at Bhusawal thermal power plant, power plants hit)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI