पालघरच्या मच्छीमारांनी जाळं टाकलं, 157 घोळ मासे हाती लागल्यानं नशीब पालटलं, सव्वा कोटींची कमाई

| Updated on: Aug 31, 2021 | 3:28 PM

वागरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षे नंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली.त्या जाळ्या मध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्याचे नशीब फळफळले.

पालघरच्या मच्छीमारांनी जाळं टाकलं, 157 घोळ मासे हाती लागल्यानं नशीब पालटलं,  सव्वा कोटींची कमाई
घोळ मासा मिळाल्यानं नशीब पालटलं
Follow us on

मोहम्मद हुसैन टीव्ही 9 मराठी, पालघर: मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात 157 घोळ मासे सापडले.त्या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील भोत(ब्लेडर) ह्याची विक्रीतून त्या मच्छिमार ग्रुपला सुमारे 1कोटी 25 लाखाची रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

157 घोळ मासे सापडल्यानं नशीब फळफळले

मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी घेऊन रवाना झाले. डहाणू-वाढवण च्या समोर समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली.वागरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षे नंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली.त्या जाळ्या मध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्याचे नशीब फळफळले.

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या व्यापाऱ्याकंडून खरेदी

सुमारे 12 किलो ते 25 किलो वजनाचे हे घोळ मासे सापडल्याने सर्व मच्छिमार आनंदात होते.घोळ माश्याच्या पोटात असलेल्या भोत ह्याला मोठी किंमत असून नर(मेल) जातीच्या भोताला व्यापाऱ्यांकडून मोठी किंमत मिळत असते.त्या तुलनेत मादी(फिमेल)जातीच्या माश्याच्या भोत ला अगदीच नगण्य किंमत मिळते.उत्तर प्रदेश,बिहार येथून आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून या भोताची खरेदी केली जाते. या विशिष्ट जातीच्या व्यापाऱ्यांची व्यवसायात मक्तेदारी असून लिलावा द्वारे या भोताची खरेदी केली जाते.सर्वात जास्त बोली लावणारा आणि पैश्याची हमी देणाऱ्या व्यापाऱ्यांची निवड विक्री दरम्यान केली जाते.

1 कोटी 25 लाखांची उच्चतम बोली

सातपाटी मध्ये सर्व प्रथम शुक्रवारी या भोताचा लिलाव एका व्यापाऱ्याच्या कमी किमतीच्या बोलीने अयशस्वी झाल्यानंतर रविवारी मुरबे येथे 15 ते 20 व्यापाराच्या उपस्थितीत लिलाव पार पडला.यावेळी 1 कोटी 25 लाखाची उच्चतम बोली लागल्याची माहिती पुढे आली.तर घोळ माश्याचे मास 300 ते 350 रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचे कळते. भोत खरेदी केल्या नंतर खूपच नाजूक रित्या या भोतावर स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते.लहान बाळाची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते त्याच धर्तीवर प्रत्येक भोताची काळजी घेताना त्या भोता मधील रक्तपेशी वेगळ्या करून एका बंद खोलीत मोठ्या काचेच्या बल्ब च्या प्रकाशात सुकवले जातात.

हॉंगकाँग,मलेशिया,थायलंड आदी देशात ह्या भोताला मोठी किंमत मिळते. सौंदर्यप्रसाधने, औषधे, शस्त्रक्रिया दरम्यान लागणार धागा बनवणे आदी साठी याचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

इतर बातम्या:

झेंडूचं फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला, नंदुरबार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

Anil Parab : अनिल परब यांना तिसरा धक्का, आता राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्तांकडून चौकशी

अद्याप कर परतावा मिळाला नाही, तर त्वरित करा हे काम, लवकरच बँक खात्यात पैसे येणार

Palghar fishers got one crore twenty five lakh rupees in auction of Croaker Fish