AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab : अनिल परब यांना तिसरा धक्का, आता राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्तांकडून चौकशी

अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Anil Parab : अनिल परब यांना तिसरा धक्का, आता राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्तांकडून चौकशी
Anil Parab inquiry by lokayukta
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 31, 2021 | 11:09 AM
Share

मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने (ED Notice) नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी आज हजर राहायचं आहे. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे. या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे.  त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 2 सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “मी चार महिन्यापूर्वी राज्यपालांकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने अनेक घोटाळे केले आहेत. त्यापैकी एक हा घोटाळा आहे. राज्यपालांनी लोकायुक्तांना त्याची चौकशी करण्यास सांगितलं होतं. आता चौकशी सुरु होत आहे. नवीन लोकायुक्त आलेले आहेत. परवा पासून चौकसी होणार आहे. परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे हा अनिल परबांचा सचिन वाझे आहे. त्याच्या द्वारे एका एका बदलीसाठी 25 लाखापासून सव्वा कोटीपर्यंत वसूल केले. त्यामुळे ईडीने काल बजरंग खरमाटे यांच्या वास्तूंवर धाडी टाकल्या. किती शोरुम, किती फ्लॅट, किती बंगलो, इतकी संपत्ती आली कुठून? अनिल परबांची संपत्तीही आपण पाहात आहात. हा पैसा कुठून आणला? सचिन वाझेकडून की या बदल्यांमधून?” असा सवाल सोमय्यांनी केला.

Anil Parab inquiry by lokayukta

Anil Parab inquiry by lokayukta

या घोटाळेबाजांना आता जेलचे दरवाजे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचे डर्टी इलेव्हन आमच्यावर सुडाच्या राजकारणाचे आरोप करत आहेत. मात्र त्यांना आता सचिन वाझेच्या बाजूची खोली दिसत आहे. प्रताप सरनाईक, अनिल परब, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, महापौर पेडणेकर असो यांनी सगळ्यांनी हजारो कोटी लुटले आहेत, हा लुटीचा माल आम्ही सरकारच्या तिजोरीत परत आणण्याचं काम करत आहोत, असं सोमय्या म्हणाले.

बजरंग खरमाटेंवर ईडीच्या धाडी  

परिवहन विभागात कार्यरत डेप्युटी आरटीओ दर्जाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी आणि काही ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली. परिवहन  खात्यात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात पहिली तक्रार गजेंद्र पाटील यांनी केली होती. त्यात खरमाटे यांचं देखील नाव होतं.

काय होती तक्रार ?

गजेंद्र पाटील यांनी मे महिन्यात तक्रार केली होती. यामध्ये परिवहन विभागात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शिवाय न्यायालयातही धाव घेत याचिका दाखल केली.

नाशिक पोलीस आयुक्तांच्या एसआयटीने 80 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. त्यात बजरंग खरमाटे यांचंही नाव होते. नाशिक पोलीस आयुक्त यांनी साडेपाच हजार पानांचा अहवाल पोलीस महासंचालक यांना पाठवला होता. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता ईडीकडून कारवाई सुरू झाली आहे.

कोण आहेत बजरंग खरमाटे?

बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

परिवहन विभागात घोटाळ्याचाही आरोप

एकीकडे बदलीचा वाद असताना दुसरीकडे परिवहन विभागात एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.  महाराष्ट्र परिवहन विभागात घोटाळा झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. परिवहन विभागात एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच आरोप आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मिहीर कोटेचा यांनी तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिवहन विभागातील ई तिकिटींगमध्ये 250 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

अनिल परब यांना ED ची नोटीस

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

VIDEO : अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

संबंधित बातम्या 

अनिल परब यांना दुसरा धक्का, खास अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचे छापे; संकट वाढणार?

ठाकरे सरकारचे ‘घोटाळा इलेव्हन’, रश्मी ठाकरे ते किशोरी पेडणेकर, किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर

Anil Parab | महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित घोटाळ्याची चौकशी होणार, अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?