अनिल परब यांना दुसरा धक्का, खास अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचे छापे; संकट वाढणार?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे, असं सूत्रांनी सांगितलं. काल ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली. या नोटीसनुसार अनिल परब यांना मंगळवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

अनिल परब यांना दुसरा धक्का, खास अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचे छापे; संकट वाढणार?
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 7:47 PM

मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस आलेली असतानाच परब यांना दुसरा धक्का बसला आहे. परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे. या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. परब यांच्या उद्या होणाऱ्या चौकशी आधीच ईडीने ही कारवाई केल्याने परब यांच्या संकटात वाढ झाल्याचं बोललं जात आहे. (ED raids on Anil Parab’s nearest RTO officer’s house; The crisis will escalate)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे, असं सूत्रांनी सांगितलं. काल ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली. या नोटीसनुसार अनिल परब यांना मंगळवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या नोटीसनंतर शिवसेनेकडून केंद्र सरकारवर बऱ्याच टिप्पण्या करण्यात आल्या.

कोण आहेत बजरंग खरमाटे?

बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

अनिल परब यांना ED ची नोटीस

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

शिवसेना खासदार भावना गवळींच्या मालमत्तांवरही ईडीचे छापे

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावरून गवळी यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याला ईडीची नोटीस आलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (ED raids on Anil Parab’s nearest RTO officer’s house; The crisis will escalate)

इतर बातम्या

आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले

IAS अधिकाऱ्यावर भाज्या विकण्याची वेळ, सगळं सोडून रस्त्यावर बसला, ‘त्या’ एका फोटोमुळे चर्चांना उधाण

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.