आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले

अनिल केऱ्हाळे

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 7:06 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पुन्हा एकदा लवकरच सीडी लावणार असल्याचं विधान केलं आहे. या विधानावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. (girish mahajan)

आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पुन्हा एकदा लवकरच सीडी लावणार असल्याचं विधान केलं आहे. या विधानावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा, असं आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिलं आहे. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. भाजपनेच खडसेंच्या मागे ईडी लावल्याचं महाजन यांनी कबूल केल्याचीही जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत. (bjp leader girish mahajan taunt eknath khadse over CD)

सीडीचा विषय आता जुना झाला असून आमची ईडी लागली आता तुमची सीडी लावा, असा टोमणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांचा वीज पुरवठा खंडित करणे चुकीचे आहे. महावितरणच्या कारभाराविरुद्ध एखादे आंदोलन उभारावे लागेल. तिसरी लाट येऊ नये यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. एकीकडे सर्व उघडे ठेवणे आणि दुसरीकडे मंदिरे बंद ठेवणे हे योग्य नाही, असेही महाजन म्हणाले.

खडसे काय म्हणाले होते?

एकनाथ खडसे यांनी काल मीडियाशी बोलताना सीडी लावण्याचा इशारा दिला होता. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले होते.

कर नाही तर डर कशाला?

गेल्या 40 वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला. कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं ते म्हणाले होते.

त्यांचीही चौकशी करा

जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही ते म्हणाले होते. (bjp leader girish mahajan taunt eknath khadse over CD)

संबंधित बातम्या:

योग्यवेळी सीडी लावणार; ईडीच्या चौकशीवरून एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा

अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच, पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल-सीबीआय

जातीनिहाय जनगणना करा, ओबीसींना संवैधानिक आरक्षण द्या; दिल्लीत समता परिषदेच्या बैठकीत ठराव मंजूर

(bjp leader girish mahajan taunt eknath khadse over CD)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI