अद्याप कर परतावा मिळाला नाही, तर त्वरित करा हे काम, लवकरच बँक खात्यात पैसे येणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 11:04 AM

मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रांमध्ये केलेल्या कर परताव्याच्या दाव्यांपैकी 93 टक्के दावे आतापर्यंत निकाली काढण्यात आलेत. निवेदनानुसार, गेल्या आठवड्यात कर परतावा म्हणून 15,269 कोटी रुपये जारी करण्यात आलेत. ते लवकरच करदात्यांच्या खात्यावर पाठवले जातील.

अद्याप कर परतावा मिळाला नाही, तर त्वरित करा हे काम, लवकरच बँक खात्यात पैसे येणार
Income Tax Department
Follow us

नवी दिल्लीः आयकर विभागाने करदात्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्रलंबित कर परताव्याचा निपटारा लवकर करण्यासाठी ऑनलाईन उत्तरे पाठविण्यास सांगितलेय. अधिकृत निवेदनानुसार, मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रांमध्ये केलेल्या कर परताव्याच्या दाव्यांपैकी 93 टक्के दावे आतापर्यंत निकाली काढण्यात आलेत. निवेदनानुसार, गेल्या आठवड्यात कर परतावा म्हणून 15,269 कोटी रुपये जारी करण्यात आलेत. ते लवकरच करदात्यांच्या खात्यावर पाठवले जातील.

म्हणून करदात्यांकडून प्रतिसाद आवश्यक

त्यात म्हटले आहे की, विभाग करदात्यांकडे मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी प्रलंबित परताव्याच्या निराकरणासाठी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यासाठी करदात्यांकडून प्रतिसाद आवश्यक आहे. ही अशी प्रकरणे आहेत जिथे आयकर कायद्याच्या कलम 245 अंतर्गत समायोजन, चुकीचे समायोजन आणि बँक खात्यांचे समेट केल्यामुळे कर परतावा झाला नाही.

ITR-1 आणि ITR-4 ची प्रक्रिया परतावा सुरू

आयकर विभागाने करदात्यांना “ऑनलाईन” शीघ्र प्रतिसाद देण्यास सांगितले, जेणेकरून मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी ITR ची प्रक्रिया जलदगतीने करता येईल. कर विभागाने असेही म्हटले आहे की, तिने मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ITR 1 (ITR-1) आणि 4 (ITR-4) ची प्रक्रिया आणि परतावा सुरू केलाय. जर कर परत केल्याचे प्रकरण असेल तर ते करदात्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

23 ऑगस्टपर्यंत 51531 कोटी रुपयांचा परतावा जारी

2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर विभागाने 23 ऑगस्टपर्यंत 51,531 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. यामध्ये 21,70,134 प्रकरणांमध्ये 14,835 कोटी रुपयांचा आयकर परतावा आणि 1,28,870 प्रकरणांमध्ये कंपनी कर परतावा 36,696 कोटींचा समावेश आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2.37 कोटींहून अधिक करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपये परत करण्यात आले. हे 2019-20 या आर्थिक वर्षापेक्षा 42 टक्के अधिक आहे.

परताव्याची स्थिती येथे तपासा

आयकर विभागाने पाठवलेल्या परताव्याच्या रकमेची स्थिती तपासण्यासाठी एखाद्याला विभागाच्या नवीन ई-फायलिंग वेबसाईटला भेट द्यावी लागते. येथे लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर आपण येथे आयकर परतावा स्थिती तपासू शकता.

ITR ची पडताळणी केली नाही तर पैसे येणार नाहीत

जर तुमचा आयटीआर प्रोफाईलमध्ये पडताळला गेला नसेल, तर तुमच्या आधारच्या मदतीने पुन्हा पडताळणीसाठी विनंती पाठवा किंवा स्वाक्षरी केलेले आयटीआर-व्ही फॉर्म स्पीड पोस्टद्वारे आयकर सीपीसी कार्यालयात पाठवा. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत परताव्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही. करदाते CPC किंवा मूल्यांकन अधिकारी यांच्याकडे तक्रार याचिका दाखल करून विभागाला ITR प्रक्रिया जलद करण्याची विनंती करू शकतात.

संबंधित बातम्या

व्यवसायात बचत खाते वापरणे किती फायद्याचं?, जाणून घ्या तोटे

पतीला पत्नीच्या मालमत्तेत किंवा व्याज उत्पन्नाचा लाभ नाहीच, MWP कायद्याचे नियम काय?

If you haven’t received a tax refund yet, do it now, the money will be in the bank account soon

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI