पेट्रोलच्या किमतीची सेंच्युरी, पेट्रोल परवडत नसल्याने पठ्ठ्याने चक्क घोडा घेतला

| Updated on: Oct 26, 2021 | 11:37 AM

सध्या पेट्रोलच्या किंमतीत दररोज वाढ होत असल्याने वाहण चालकांना पेट्रोल परवडत नाही आहे. अशात पेट्रोलच्या किंमतीत रोज होणारी वाढ यामुळे वाहन चालकांना दररोज धक्का बसत आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील तेंडोळी येथील दत्ता थावरा राठोड याने पेट्रोलच्या किंमतीत होणाऱ्या वाढीला कंटाळून चक्क घोडा विकत घेतला.

पेट्रोलच्या किमतीची सेंच्युरी, पेट्रोल परवडत नसल्याने पठ्ठ्याने चक्क घोडा घेतला
पेट्रोलच्या किंमती परवडत नाही म्हणून घोडा खरेदी केला
Follow us on

यवतमाळ : सध्या पेट्रोलच्या किंमतीत दररोज वाढ होत असल्याने वाहण चालकांना पेट्रोल परवडत नाही आहे. अशात पेट्रोलच्या किंमतीत रोज होणारी वाढ यामुळे वाहन चालकांना दररोज धक्का बसत आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील तेंडोळी येथील दत्ता थावरा राठोड याने पेट्रोलच्या किंमतीत होणाऱ्या वाढीला कंटाळून चक्क घोडा विकत घेतला.

दुचाकीला दूर करत या व्यक्तीने पंधरा हजार पाचशे रुपयाचा घोडाच विकत घेतला आणि त्या घोड्याने ते रोज पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करताहेत. घोडा घेतल्याने आता पेट्रोलचे भाव कितीही वाढले तरी मला काही घेणे देणे नसल्याचे दत्ता राठोड यांचं म्हणणं आहे.

दुचाकीला टायर, ऑईल चेंज आणि त्याला लागणारं पेट्रोल हे सर्व सामान्य नागरिकांना न परवडणारं आहे. पेट्रोल 105 रुपये प्रती लिटर झालंय. दत्ता यांनी घोडा घेतल्याने पेट्रोलच्या किंमतीत कितीही वाढ झाली तरी त्याला काही फरक पडणार नाही. त्यामुळे पेट्रोलची डोकेदुःखी दूर करायची असेल तर घोडा घ्या किंवा सायकलने प्रवास करा असे तो रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना सांगतोय.

पेट्रोलची किंमत 113.46 रुपये प्रतिलीटर

भारतातील IOC, HPCL आणि BPCL या पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधनाचे नवे दर जाहीर केले. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. हे दिवस आज दिवसभरासाठी लागू राहतील. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.46 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.59 आणि 96.32 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतात इंधनदरात प्रचंड वाढ

देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?