Narendra Modi: माओवादाचे कंबरडे मोडले, आता… नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा, काँग्रेसवरही मोठी टीका
Narendra Modi Speech on Janjatiya Gaurav Din: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या उपाय योजनांची उजळणी करतानाच भगवान बिरसा मुंडा यांच्या उलगुलानकडून प्रेरणा घेत नक्षलवादाचे कंबरडे मोडल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अरूणाचल प्रदेश, मिझोरम, महाराष्ट्रसह आदिवासी भागातील विविध सुविधांचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले.

Narendra Modi: जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूणाचल प्रदेश, मिझोरम, महाराष्ट्रसह आदिवासी भागातील विविध सुविधांचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. तर यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या उलगुलानकडून प्रेरणा घेत नक्षलवादाचे कंबरडे मोडल्याचे सांगितले. माओवाद देशातून संपल्याचे त्यांनी जाहीर केले. तर जागतिक बँकेच्या अहवालाचा दाखला देत भारतीय दारिद्र्य रेषेच्या बाहेर आल्याचे सांगितले. त्यांनी जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा देत भगवान बिरसा मुंडा यांना वंदन केले.
50 कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले
भगवान बिरसा मुंडा यांचे उलगुलान आपल्यासाठी प्रेरणा आहे. आपण बिरसा मुंडा यांची प्रेरणा घेऊ या. आधी असे दिन परकीय व्यक्तीशी जोडले जायचे, आता आपल्या व्यक्तींशी निगडित दिन साजरा होत आहे. आपण आज मिझोरम पासून सर्व देशभरात विविध सुविधांचे लोकार्पण झाले. देशभरातील वेगवेगळ्या भागात आदिवासी वीरांनी आंदोलनाला दिशा दिली. 50 कोटी लोक गरीब रेषेच्या वर आले हे आपले यश आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
नक्षलवाद संपला, आता विकासाची गंगा
देशातील 125 जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हातपाय पसरले होते. आदिवासी संकटात असताना तत्कालीन सरकारे सर्व मौन बाळगून होते. पण आता नक्षलवाद, माओवाद संपल्याचे, त्यांचे कंबरडे मोडल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे यश असल्याचे ते म्हणाले. आम्ही गेले 12 वर्षे आदिवासी विकासासाठी परिणामकारक योजना राबविल्या. आम्ही 4 कोटी पक्की घरे बनविली. आम्ही आदिवासींचे उत्पन्न वाढविण्यासाठी योजना दिल्या आणि राबवल्या. आदिवासी समाजासाठी प्रगतीची दारे उघडली, असे पंतप्रधान म्हणाले.
गडचिरोली नव्हे सर्व आदिवासी बहुल जिल्ह्यात नक्षलवादाने आदिवासींचे नुकसान केले. देशातील 125 जिल्हे बाधित होते. अल्पवयीन मुलांना चळवळीत नेले जायचे, आज नक्षलवाद संपला तेव्हा आया बहिणी आम्हाला आशीर्वाद देत आहेत. मी यंदा बस्तरमध्ये दिवाळी साजरी केली, ही नवी सुरुवात आहे, असे मोदी म्हणाले.
गडचिरोलीत जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल ओराम, केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री, राज्याचे आदिवासी मंत्री ,जिल्ह्यातील आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी विविध आदिवासी भागातील विकास योजनांची माहिती यावेळी दिली.