Nandurbar | सततच्या पावसामुळे नंदुरबार जिल्हातील रस्त्यांचे वाजले तीन तेरा, अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ…

महामार्गावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसात अपघातांच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे. महिनाभरपूर्वी शहादा तालुक्यातील नागरिकांनी रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आंदोलन देखील केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली होती.

Nandurbar | सततच्या पावसामुळे नंदुरबार जिल्हातील रस्त्यांचे वाजले तीन तेरा, अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ...
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 10:48 AM

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे (Rain) रस्त्यांची चाळण झालीयं. अनेक रस्ते हे नादुरुस्त झाले आहेत. जिल्ह्यातून महत्वाचे महामार्ग जातो. मात्र तरी देखील त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशला जोडणारा अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्ग नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून जातो. मात्र, या महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना या महामार्गावरून गाडी चालवताना आपला जीव मुठीत घ्यावा लागतो. इतकेच नाही तर रस्त्यांवरील (Road) खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झालीयं.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ

महामार्गावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसात अपघातांच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे. महिनाभरपूर्वी शहादा तालुक्यातील नागरिकांनी रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आंदोलन देखील केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली होती. मात्र, सततच्या पावसामुळे परत एकदा रस्त्यांचे तीन तेरा वाजल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

रस्त्याच्या समस्येसंदर्भात नागरिकांचा शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार

या महामार्गाची परिस्थिती जैसे थे तैसे झाली असून पुन्हा या महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. शासन दरबारी अनेक वेळा पत्रव्यवहार केले. मात्र शासन आमच्या पत्राकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांची डागडुजी न करता एकदा रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.