AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पा पावला! रात्री 12 नंतर परशुराम घाट आता सर्व वाहनांसाठी खुला, 2 महिन्यांनी निर्बंध हटवले

Mumbai Goa Highway ; रात्रीच्या वेळी या महामार्गावरुन अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक पाहता, हा निर्णय अनेकांना दिलासा देणारा ठरेल, असं बोललं जातंय.

बाप्पा पावला! रात्री 12 नंतर परशुराम घाट आता सर्व वाहनांसाठी खुला, 2 महिन्यांनी निर्बंध हटवले
परशुराम घाटImage Credit source: Social Media
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Aug 25, 2022 | 7:26 AM
Share

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरुन (Mumbai Goa Highway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परशुराम घाटात आता रात्रीच्या वेळी कोणत्याही वाहनांवर निर्बंध नसणार आहेत. सर्व वाहनांसाठी मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या घाट रस्त्यांपैकी एक असलेला परशुराम घाट (Parshuram Ghat) वाहतुकीसााठी खुला करण्यात आला आहे. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून या घाटातील वाहतुकीवर निर्बंध होते. रात्रीच्या वेळी या महामार्गावरुन अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आता गणेशोत्सवाच्या (Konkan Ganpati Festival) पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक पाहता, हा निर्णय अनेकांना दिलासा देणारा ठरेल, असं बोललं जातंय. परशुराम घाटात गेल्या काही आठवड्यांपूर्वी जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे या घाटातील वाहतूकही अनेक तास बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून अवजड वाहनांसाठी घाटातून रात्रीच्या वेळी वाहतूक करण्यावरही निर्बंध घालण्यात आले होते.

जुलै महिन्यात रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपून काढलं होतं. त्याचा फटका परशुराम घाटालाही बसला होता. परशुराम डोंगराला भेगा गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. अखेर 5 जुलैपासून हा घाट वाहतुकीचासाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर काही मर्यादित वेळेत 14 जुलैपासून घाटातील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. पण अवजड वाहनांच्या एकेरी मार्गिकेसाठी हा घाट सायंकाळी 7 नंतर इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा सर्वच वाहनांना हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसे आदेशही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काळजीही घ्या..

दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्यानं मोठ्या प्रमाणात गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी याच मार्गाने जात असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचीही भीती असते. अशावेळी घाटातील वाहतूक बंद ठेवली तर वाहतुकीचा बोजवारा उडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिकांच्या मागणीनंतर आणि ज्येष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार-लोकप्रतिनिधी यांच्या चर्चा करत अखेर परशुराम घाट पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्यासोबत कंत्राटदारास योग्य ती खबरदारी घेण्याचेही निर्देश देण्यात आलेत. 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देण्यासोबत रात्री पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, नियमित पेट्रोलिंग, क्रेन, पोकलेन, जेसीबी तैनात ठेवण्याबाबतही आवाहन करण्यात आलंय.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?