तर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं; दीपक केसरकर यांचा नारायण राणेंना टोला

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगम मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यंनी त्यावर पलटवार केला आहे. (Shiv Sena leader deepak kesarkar slams narayan rane)

तर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं; दीपक केसरकर यांचा नारायण राणेंना टोला
deepak kesarkar
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 4:45 PM

सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगम मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यंनी त्यावर पलटवार केला आहे. केंद्रात सातत्याने बदल होत असतो. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स दाखवा. नाही तर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं, असा टोला दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला आहे.

दीपक केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. नारायण राणेंवर मला जास्त बोलायचं नाही. मात्र राणेंना केंद्रात चांगलं खातं मिळालं आहे. त्यांनी त्याचा वापर जिल्ह्यासाठी काय केला? कारण सांगता येत नाही. कोणाचं करिअर कितीही मोठं असलं तरी केंद्रामधे सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही जर परफॉर्मन्स नाही दाखवला तर तुमचं खातं जावू शकतं. केवळ राजकारण करून आपण टीकू शकतो का? याचा विचार राणेंनी केला पाहिजे. कोणतंही मंत्रीपद हे जनतेची सेवा करण्यासाठी असते. त्यांचंही करीयर मोजकचं असू शकतं. काहीच सांगता येत नाही, असा दावा केसरकर यांनी केला.

तर जनताच जागा दाखवेल

महाराष्ट्र सरकारची कारकिर्द शिल्लक आहे. आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवत आहोत. राणेंनी त्यांचा परफॉर्मन्स दाखवला पाहिजे. आधी आपण काय करू शकतो ते दाखवून द्या. मग आमच्यावर टीका करा. पाच वर्षासाठी केंद्र सरकारला सत्तेत बसवलं आहे. त्यांना गुणवत्ता सिद्ध केली नाही तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असंही त्यांनी सांगितलं.

मग तो भ्रष्टाचार नाही का?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत ते मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीत किती चांगलं कामं करत आहेत हे लोकांना बघण्याचा अधिकार आहे. लोकांचा हा अधिकार तुम्ही का छिनून घेताय? असा सवाल करतानाच तुम्ही पैसे देऊन आमदार फोडाफोडी करता. मग तो भ्रष्टाचार नाही का?, असा सवालही त्यांनी केला.

राणे काय म्हणाले होते?

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटला जात नाहीत. मंत्रालयात जात नाही. काय काम करायचं तेही माहीत नाही. पण नको त्या विषयावर बोलतात. हे काय मुख्यमंत्री आहेत का? माझ्या आयुष्यात कोणत्याच राज्यातील असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर यांचंच नाव घ्यावं लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. मातोश्रीत बसूनच सर्व काम होतात. महाराष्ट्र पाहा किती प्रगती केली आहे. लोकांच्या हिताचं एक तरी काम केलं का? अशी टीका त्यांनी केली होती. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावाही राणेंनी केला होता.

 

संबंधित बातम्या:

दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी

तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल, तेव्हा बोंबलू नका; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

(Shiv Sena leader deepak kesarkar slams narayan rane)