AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. गेल्या 4 तासांपासून ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. कणकवली, कुडाळ, नांदगाव, राजापूर या रेल्वे स्थानकांत गाड्या थांबलेल्या आहेत.

BREAKING | मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 8:49 PM

सिंधुदुर्ग | 20 जुलै 2023 : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. गेल्या 4 तासांपासून ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. कणकवली, कुडाळ, नांदगाव, राजापूर या रेल्वे स्थानकांत गाड्या थांबलेल्या आहेत. सिंधुदुर्गात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कुडाळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवाशी प्रचंड वैतागले आहेत. नेमकं काय झालंय? गाडी कधी सुरु होणार? याबाबत त्यांना काहीच माहिती मिळत नाहीय. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील शाळा आणि महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशीही सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्याही जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश काढले आहेत.

गड व तेरेखोल नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड आणि तेरेखोल या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. गड नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, फणसनगर आणि मालवण तालुक्यातील मसुरे, मर्ड, बांदिवडे बुद्रुक तर तेरेखोल नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या इन्सुली, बांदा, शेर्ले, तळवडे, आरोंदा, किनळे, कवठणी, सातार्डा, सातोसे या गावांतील नागरिकांनी दक्षता यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. पुराच्या पाण्यात जावू नये. आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या (०२३६२)२२८८४७/१०७७ तसेच तालुका नियंत्रण कक्षाच्या (०२३६३) २७२०२८ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

गड नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. पुराच्या पाण्यात जावू नये. आपत्कालीन स्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या (०२३६२) २२८८४७/१०७७ तसेच तालुका नियंत्रण कक्षाच्या कणकवली करीता (०२३६७) २३२०२५ आणि मालवण करिता (०२३६५) २५२०४५ या क्रमांकाशी संपर्क साधावा.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.